DNA मराठी

DNA Marathi News

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, आता राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’

Devendra Fadanvis : राज्यात ‘ई कॅबीनेट’ आणि या बैठकीत होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कारभार गतीमान आणि पारदर्शी करण्यावर भर दिला असून मंत्रिमंडळातील निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहचणे, त्यातून शासकीय कामकाजाला गती देणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. याबाबतचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केले. राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई कॅबीनेटचा निर्णय घेतला आहे. ‘ई-कॅबिनेट’ हा राज्य शासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी करण्यासाठी हे संपूर्ण आयसीटी (ICT) सोल्यूशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या हरित उपक्रमांतर्गत स्मार्ट टॅब्लेट्सद्वारे कागदविरहीत मंत्रिमंडळ बैठक सहज पार पडू शकेल. या प्रणालीमुळे मा. मंत्र्यांसाठी अत्यंत सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल. त्याचबरोबर आवश्यक संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पॉइंट) पाहणे आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन करणे सोपे होईल. ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होईल. ही प्रणाली पूर्णपणे डीजिटल स्वरूपात असून याद्वारे प्रत्येक टप्पा सहज पार पाडला जाईल. आतापर्यंत होत आलेल्या पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणारा प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करणे, तो मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करणे, त्यावर अंतिम निर्णय व त्याबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे, ही सर्व प्रक्रिया सहजरित्या पार पडणार आहेत. हा सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रणालीमुळे कागदांचा वापर कमी होण्यासोबतच मंत्रिमंडळाचा आणि या प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, आता राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ Read More »

देशात वाढत आहे HMPV व्हायरसचा धोका, आता तामिळनाडूमध्ये दोन लोकांना संसर्ग

HMPV Virus : देशात एचएमपीव्ही व्हायरसचा धोका वाढत असल्याचा दिसून येत आहे. माहितीनुसार आता तामिळनाडूमध्ये देखील दोन जणांना या वायरसची लागण झाली आहे. एक चेन्नई आणि एक सेलममध्ये आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी सांगितले की, दोन्ही बाधित व्यक्तींची प्रकृती सध्या स्थिर आहे. एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही आणि तो आधीपासून प्रसारित होणारा विषाणू आहे जो 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला होता, असे तामिळनाडू सरकारच्या DIPR द्वारे जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे. एचएमपीव्ही संसर्ग स्वयं-मर्यादित असतात आणि काळजीपूर्वक निराकरण करतात. सध्या मानवी मेटापन्यूमोव्हायरसची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, एक चेन्नईमध्ये आणि एक सेलममध्ये, ते स्थिर आहेत आणि त्यांचे निरीक्षण केले जात आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठक घेतलीतामिळनाडूमध्ये आढळलेल्या सामान्य श्वसन विषाणूजन्य रोगजनकांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. 6 जानेवारी 2025 रोजी, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्य आरोग्य अधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला तामिळनाडूतील वरिष्ठ आरोग्य अधिकारीही उपस्थित होते. भारत सरकारने स्पष्ट केले की एचएमपीव्ही विषाणू स्थिर आहे आणि घाबरण्याचे कारण नाही. सावधगिरी बाळगाHMPV चे प्रतिबंध हे इतर श्वसन संक्रमणाप्रमाणेच आहे जसे की शिंकताना/खोकताना आपले तोंड आणि नाक झाकणे, हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे आणि गरज पडल्यास आरोग्य सुविधेला तक्रार करणे. HMPV वर सामान्यतः नेहमीच्या पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात याची जनतेला खात्री देण्यात आली आहे. घाबरण्याची गरज नाही. तामिळनाडू सरकार वचनबद्ध आहे आणि इन्फ्लूएंझा सारख्या आजारांवर आणि तीव्र तीव्र श्वसन आजारांवर सतत लक्ष ठेवत आहे, असे प्रकाशनात म्हटले आहे. सरकार म्हणाले, काळजी करण्यासारखे काही नाहीभारतात मानवी मेटापन्यूमोव्हायरसची तीन प्रकरणे आधीच आढळून आली आहेत. यापैकी दोन प्रकरणे कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये आढळून आली आहेत तर आणखी एक प्रकरण गुजरातमध्ये नोंदवण्यात आले आहे. अशाप्रकारे देशात एकूण 5 प्रकरणे समोर आली आहेत. भारतात मानवी मेटापन्यूमोव्हायरसची तीन प्रकरणे आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी जनतेला आश्वासन दिले की काळजी करण्याची गरज नाही. 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखल्या गेलेल्या या विषाणूपासून कोणताही नवीन धोका नाही यावर त्यांनी भर दिला.

देशात वाढत आहे HMPV व्हायरसचा धोका, आता तामिळनाडूमध्ये दोन लोकांना संसर्ग Read More »

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल

Eknath Shinde: उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. उबाठा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केले. उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात नवी मुंबईतील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, शिवसेना उबाठा गटाचे कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे. दुसरीकडे पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट धरली.यात उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी आज पक्षप्रवेश केला. तर धुळे जिल्ह्यातून माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संदीप चव्हाण, चंद्रकांत मस्के, मनीषा शिरोळे, आधार हाके आदी पदाधिकारी, तर धुळे शहरातील माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, पुरुषोत्तम जाधव, शेखर दुधाने, धुळे ग्रामीण मधील संजय माळी, सुधाकर पाटील, किशोर माळी, किशोर देवरे, साक्री शहरातील महावीर जैन, नितीन गायकवाड, महेश खैरनार, हर्षल माळी तसेच धुळे शहरातील युवासेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील नागरिकांनी शिवसेनेची भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे 57 आणि 3 सहयोगी पक्षाचे असे 60 उमेदवार निवडून आले. त्यामुळे जनतेने शिवसेनेची साथ दिली असून, खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल Read More »

Maharashtra Politics: शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात इलेक्शन पिटीशन दाखल

Maharashtra Politics: एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे. अर्जुन खोतकरांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचा आरोप या याचिकेत कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने खोतकरांचा अर्ज आक्षेपानंतरही कायम ठेवल्याचा गोरंटयाल यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिका दाखला करण्यात आली असल्याची माहिती गोरंटयाल यांनी दिली आहे. तसेच न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल अशी अपेक्षाही गोरंटयाल यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics: शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात इलेक्शन पिटीशन दाखल Read More »

Suresh Dhas : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मीटिंग अन् अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी, सुरेश धस यांचा धक्कादायक दावा

Suresh Dhas : 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांचे पीए जोशी त्यांच्या माध्यमातून अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्याबोरबर संधान साधत होते परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचे वाल्मिक कराड यांनी काम बंद पाडले. तसेच धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली गेली त्यापैकी दोन कोटींच्या खंडणीची डील झाली असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला. पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज आहे, पोलिसांनी त्याला पकडले तर यातील बरेचसे राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये निवडणूक काळात यांनी त्या कंपनीकडून घेतले, उर्वरीत दीड कोटीच्या मागणीसाठी गेले तेव्हा वॉचमनला मारले तेव्हा संतोष देशमुख तिथे मध्ये गेला आणि त्यांचा अमानवीय कृत्य करुन मर्डर केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन कुलकर्णी नावाचा आका वाल्मिक कराड यांचा पीए आहे तो 17 मोबाईल नंबर वापरतो, नितीन कुलकर्णीला अटक करुन 17 मोबाईल जप्त करा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.

Suresh Dhas : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मीटिंग अन् अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी, सुरेश धस यांचा धक्कादायक दावा Read More »

Ahilyanagar News : वाढणार सुरक्षा अन् गुन्हे होणार कमी, वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आवाहन

Ahilyanagar News : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी)बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांना नंबर प्लेट बसविणे करीता सेवा पुरवठादार एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स या संस्थेची यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. सेवापुरवठादार यांचे अधिकृत संकेतस्थळ htttp://maharashtrahsrp.com या संकेतस्थळावर जाऊन वाहन क्रमांकाची ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगांव, संगमनेर, अकोले या तालुक्यांकरीता सेवापुरवठादार यांच्याकडून श्रीरामपूर येथील मुळे मोटर्स, बेलापुर रोड श्रीरामपूर, राहुल ट्रॅक्टर्स श्रीरामपूर, शिरोडे ऑटोमोबाईल्स प्रा.लि. श्रीरामपूर हे अधिकृत फिटमेंटर सेंटर नियुक्त करण्यात आलेले आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी वाहन व ट्रॅक्टर्ससाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी चारचाकी, ट्रक, ट्रेलर्स व इतर वाहनांसाठी ७४५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केले आहे.

Ahilyanagar News : वाढणार सुरक्षा अन् गुन्हे होणार कमी, वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आवाहन Read More »

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई

Pushpa 2 : सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ आता देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. याच बरोबर आता या चित्रपटाने अनेक विक्रम देखील स्वतःच्या नावावर केले आहे. माहितीनुसार, पुष्पा 2 ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली तर दुसर्‍या आठवड्यात 264.8 कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या आठवड्यात तब्बल129.5 कोटी रुपये जमा केले. तर चौथ्या शुक्रवारी 8.75 रुपये कोटीचा व्यवसाय केला. यामुळे 1700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे नुकतंच रिलीज झालेले ‘वनवास’, ‘मुफासा’ आणि ‘बेबी जॉन’ या सिनेमांना देखील पुष्पा 2 ला टक्कर देता आली नाही. पुष्पा 2 ने सगळ्यात अगोदर देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ला मागे टाकलं. 2017 मध्ये रिलीज झालेल्या प्रभासच्या या सिनेमाने 1030.42 कोटींचा गल्ला जमवला होता. पुष्पा 2 नं यापेक्षा जवळपास 120 कोटी रुपये जास्त कमावले आहेत. तसेच पुष्पानं किंग खानलाही मागे टाकलं आहे.

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई Read More »

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार

Maharashtra News: तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीत आदेशातील रक्कम शासन जमा न केल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, अहिल्यानगर जवळील गंगा उद्यानाच्या मागील बाजूस जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसीलदार अहिल्यानगर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे.

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार Read More »

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक?

Valmik Karad : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई करत पुण्यातून वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी होत होती. तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 21 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक? Read More »

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

Happy New Year: नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. कर आणि अनुदानांमध्ये बदलआता 1% TCS (टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स) 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हँडबॅग आणि घड्याळे यांसारख्या लक्झरी वस्तूंवर लागू होईल. कारच्या किमतीत वाढमारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत 4% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.Hyundai ने 25,000 पर्यंत आणि Mahindra ने 3% ने किमती वाढवल्या आहेत. Mercedes-Benz, BMW आणि Audi सारख्या लक्झरी कार कंपन्या देखील किमती 3% पर्यंत वाढवत आहेत. जुन्या फोनवर व्हॉट्सॲप सपोर्ट नसणारव्हॉट्सॲप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे बंद करेल. याचा परिणाम Samsung Galaxy S3, Motorola Moto G (1st Gen), HTC One X आणि Sony Xperia Z सारख्या मॉडेल्सवर होईल. UPI पेमेंटची नवीन मर्यादाफीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट मर्यादा 5,000 वरून 10,000 करण्यात आली आहे. या बदलामुळे 123Pay सेवेअंतर्गत ग्रामीण भागातील लहान व्यापारी आणि वापरकर्त्यांना फायदा होईल. या बदलाचा काय परिणाम होतो?2025 चे हे बदल सामान्य ग्राहक आणि बाजाराची दिशा ठरवतील. एकीकडे कर आणि डिजिटल पेमेंटमुळे जीवन सुकर होणार आहे, तर दुसरीकडे रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार Read More »