Valmik Karad : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई करत पुण्यातून वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी होत होती. तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 21 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.