DNA मराठी

ahmednagar news

suresh kalmadi

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi  passed away  : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी अगदी कमी वेळेत पुण्यातील राजकारणा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरेश कलमाडी काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. कोण होते सुरेश कलमाडी ? सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2010 नंतर मात्र त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले तसेच सुमारे नऊ महिने कारावासही भोगावा लागला.

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन Read More »

vikhe patil

Bhandardara Dam Centenary : भंडारदरा धरण ‘शताब्दी वर्षात’ जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा पालकमंत्री विखे पाटलांचे आदेश

Bhandardara Dam Centenary : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, या निमित्ताने हे धरण शाश्वत व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले पाहिजे. यासाठी जुन्या वास्तूंचे जतन, वॉटर टुरिझम व स्थानिकांना रोजगार देणारा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पर्यटन विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी निळवंडे धरण विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, माजी सभापती मारुती मेंगाळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व सोनल शहाणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, 2026 पासून धरणाचे 100 वे वर्ष सुरू होत आहे. त्यादृष्टीने ‘डॅम रिहॅबिलिटेशन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट’ (DRIP) अंतर्गत निधी व राज्य शासनाचा विशेष निधी वापरून कामे केली जातील. या महोत्सवाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग, वन विभाग व एमटीडीसी यांनी समन्वय साधून 15 दिवसांत अंतिम ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा, जेणेकरून त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करता येईल. काय आहेत प्रमुख आकर्षणे व योजना लेझर शो आणि डॉक्युमेंटरी : पर्यटकांच्या आकर्षणासाठी धरणाच्या भिंतीवर इतिहासाचा उलगडा करणारा भव्य ‘लेझर शो’ व डिजिटल डॉक्युमेंटरी दाखवली जाईल. तसेच, हा शो पाहण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचे ॲम्फीथिएटर विकसित केले जाईल. वॉटर टुरिझम आणि अम्ब्रेला फॉल पाण्याचा पुनर्वापर करून सुट्टीच्या दिवशी ‘अम्ब्रेला फॉल’ सुरू ठेवण्याचे नियोजन करावे. तसेच, अधिकृत ‘बोटिंग क्लब’ स्थापन करून लाईफ जॅकेट वापरणे सक्तीचे करावे आणि रेस्क्यू बोटची उपलब्धता अनिवार्य करावी. चित्रपट आठवणी व निसर्ग : या परिसरात चित्रीकरण झालेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी जागवण्यासाठी विशेष म्युझियम, जुन्या नकाशांचे प्रदर्शन आणि शताब्दी स्मृती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. स्थानिकांना रोजगार जलसंपदा विभागाने धरण परिसरातील अतिक्रमण हटवून सुमारे 17 ते 18 हेक्टर जागा उपलब्ध केली आहे. या जागेवर पर्यटनाचे प्रकल्प उभारले जातील. प्रदूषण टाळण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालून इलेक्ट्रिक बस किंवा गोल्फ कार्ट्सची सुविधा सुरू केल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. तसेच, आदिवासी भागातील उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ, गाईड व्यवसाय आणि रिसॉर्ट्सच्या माध्यमातून स्थानिकांना संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड आणि रतनगड या परिसरातील ट्रेकिंग पॉईंट्सवरही पर्यटकांना सुविधा पुरवण्याबाबत विचार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Bhandardara Dam Centenary : भंडारदरा धरण ‘शताब्दी वर्षात’ जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा पालकमंत्री विखे पाटलांचे आदेश Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी

Prajakt Tanpure : बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीज द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व विशेषतः राहुरी तालुक्यात, शहरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरु झाल्याने शेतकरी, नागरिक, स्त्री शाळकरी मुले, यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवस व रात्री अशा दोन्ही वेळेस कधी रात्री तर कधी दिवसा अश्या शिफ्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. सद्या शेतीमध्ये गहू, हरभरा,ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र सर्वत्र बिबट्यांचा वाढता संचार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. व अडीच वर्ष राज्यमंत्री असताना त्यांनी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात प्रतिनिधिक स्वरूपात काही गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले त्यात तालुक्यात बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी या गावात हे प्रकल्प कार्यान्वितही झाल्याने त्याभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली त्याचबरोबर मतदारसंघात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे. रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी Read More »

high cholesterol

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे

Cholesterol 5 Symptoms : कोलेस्टेरॉलच्या समस्या हृदयाशी जोडल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याची सुरुवातीची लक्षणे पायांमध्ये दिसतात? WHO, WebMD आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने उच्च कोलेस्टेरॉलची पाच लक्षणे सूचीबद्ध केली आहेत जी कधीही दुर्लक्षित करू नयेत. लोक सहसा असे गृहीत धरतात की उच्च कोलेस्टेरॉल हृदयाशी संबंधित आहे, आणि म्हणूनच, त्याची लक्षणे हृदयात किंवा छातीच्या भागात दिसून येतील. पण तुम्हाला माहित आहे का की उच्च कोलेस्टेरॉलची सुरुवातीची लक्षणे प्रथम पायांमध्ये दिसतात? आपले शरीर आपल्याला वारंवार हे संकेत देते, परंतु आपण त्यांना साधे थकवा किंवा अशक्तपणा म्हणून नाकारतो? अमेरिकन हार्ट असोसिएशन, WHO आणि WebMD नुसार, उच्च कोलेस्टेरॉलची ही पाच लक्षणे आहेत. चालताना पाय दुखणे जर तुम्हाला चालताना तुमच्या खालच्या पायांमध्ये, मांड्यांमध्ये किंवा कंबरेमध्ये वेदना किंवा पेटके येत असतील आणि थांबल्यानंतर वेदना कमी होत असतील, तर ते रक्त प्रवाह खराब होण्याचे लक्षण असू शकते. थोडे चालल्यानंतरही लवकर थकणे जर तुमचे शरीर ठीक असेल परंतु तुमचे पाय लवकर थकतात, तर हे खराब रक्ताभिसरणाचे लक्षण असू शकते. तुमच्या नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे तुमच्या स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे पायऱ्या चढणे किंवा लांब चालणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण वाटू शकते. एक पाय दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटू शकते जर एक पाय अनेकदा दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटत असेल, विशेषतः चालल्यानंतर, तर हे रक्तपुरवठ्याच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. रक्त शरीराला उष्णता प्रदान करते, त्यामुळे रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे पाय थंड वाटू शकतो. कधीकधी, त्वचा थोडीशी फिकट किंवा निळी होऊ शकते. बोटांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे पायांच्या बोटांमध्ये वारंवार मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे हे रक्तप्रवाह खराब झाल्यामुळे होऊ शकते. शिरांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचे कार्य बिघडते. जर हे बराच काळ चालू राहिले तर पायांच्या जखमा लवकर बऱ्या होणार नाहीत. पायांवर डाग आणि रंग बदलणे जर चालताना तुमच्या पायांची त्वचा फिकट, डाग असलेली किंवा हलकी निळी झाली तर ते रक्ताभिसरण खराब होण्याचे लक्षण आहे. गंभीर प्रकरणांमध्ये, त्वचा चमकदार दिसू शकते. पायांवर केसांची वाढ देखील मंद असते आणि जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागतो.

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे Read More »

Crime

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आता पुण्यातील कायदे सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाळात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या यानंतर गणेश काळे वर कोयत्याने वार करण्यात आला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता. आयुष कोमकर हत्याप्रकरणी दत्ता काळे याला अटक करण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा?

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची 30 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात जाहीर सभा होणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष अंजर खान यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार असून या सभेतून खासदार ओवैसी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह 30 सप्टेंबर रोजी शहरात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेतून अहमदनगर शहरासाठी एमआयएमकडून कोणती मोठी घोषणा करण्यात येणार याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा? Read More »

affair

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या

Panvel Crime: पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्ख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तु काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दत्तु काळे यांचा मुलगा दिपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे.

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या Read More »

devendra fadnavis

Ahilyanagar News : आठ महिन्यात 22 हजार जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण; विद्यार्थी व अर्जदारांना दिलासा

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत २२ हजार विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित केली आहेत. समितीच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हजारो विद्यार्थ्याना व अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सुयोग्य व्यवस्थापन यामुळे प्रमाणपत्रांचे वितरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, त्रुटी पूर्तता शिबिरे, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. यामध्ये आता १७ सप्‍टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या समितीमध्ये अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) रेश्मा माळी, सदस्य तथा उपायुक्त राकेश पाटील, व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांची त्रिस्तरीय समिती जातवैधता पडताळणीचे काम जलद गतीने करत आहे. त्यामुळेच १ जानेवारी २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकूण २५ हजार २७९ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी २२ हजार ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जात (SC) वर्गातील ३ हजार १५१ पैकी २ हजार ८५८, विमुक्त जाती/भटक्या जमाती (VJNT) वर्गातील ५ हजार १३० पैकी ४ हजार २८७, इतर मागासवर्गीय (OBC) वर्गातील १४ हजार ३०८ पैकी १२ हजार ६८६, विशेष मागासवर्गीय (SBC) वर्गातील ८२० पैकी ६४३, तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) वर्गातील १ हजार ८७० पैकी १ हजार ५३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अर्जदार स्तरावर त्रुटी पूर्ततेसाठी १ हजार ५७७ प्रकरणे प्रलंबित असून १ हजार ६९६ प्रकरणे निर्णय प्रक्रीयेत आहेत. सद्यस्थितीत जिल्हा समिती परिपुर्ण जातदाव्याच्या प्रकरणांवर ३५ ते ४० दिवसांच्या आत निर्णय घेत आहे. ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे आवश्यक आहेत त्याबाबत ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेल्या असून अर्जदारांनी त्रुटी पुर्ततेची कागदपत्रे प्रत्यक्ष समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात समक्ष जमा केल्यानंतर सदर जातदाव्याचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही केली जात आहे. अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, जातदाव्याचे प्रकरण दाखल करतांना अर्जदारांनी विहित नमुन्यात नमुना 3 आणि नमुना १७ चे शपथपत्र कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावा. मोडीभाषेतील पुरावे शासन मान्यता प्राप्त मोडी लिपी वाचकाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावे. साध्या पेपरवर टंकलिखीत केलेले शपथपत्र देखील समिती ग्राह्य धरत असल्यामुळे शपथपत्रासाठी स्टँम्प पेपरची आवश्यकता नाही. अर्जात नमूद केलेल्या वंशावळ शपथपत्रानूसार महसुली व शालेय पुराव्यांच्या प्रमाणित प्रती अर्जदाराने प्रस्तावासोबत उपलब्ध करुन दिल्यास संबंधित प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात येते. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित अर्जदार व पालकांना आवाहन करण्यात येते की, सन 2025-2026 या वर्षाअखेरीस CET व्दारे प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जदारांनी वेळेवर धावपळ करण्याऐवजी तात्काळ महाविद्यालयांमार्फत प्रकरणे समिती कार्यालयाकडे जमा करावीत, जेणेकरुन व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी समितीवर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन अर्जदारांना देखील वेळेत जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करणे सुलभ होईल. महाविद्यालयांना सूचना महाविद्यालयांनी जातदावा प्रकरणांसाठी विहीत फार्म नंबर १५ A वर महाविद्यालय प्राचार्यांची सही व शिक्यासह देण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमावा. विद्यार्थ्यांना जातदाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. समितीच्या वतीने दिलेल्या सुचना व माहिती पत्रकांची १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना माहिती देऊन सर्व पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज जमा करुन घ्यावे. जेणेकरुन १२ वी विज्ञान अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना व पालकांना पुढील शैक्षणिक हित साध्य करणे सुलभ होईल. ही कागदपत्रे जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज, प्राचार्यांची स्वाक्षरी असलेला फॉर्म 15 A व महाविद्यालयाचे चालु वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, अर्जदार, वडील, आजोबा यांचे शालेय दाखले/ जातीविषयक महसुली पुरावे, जातदाव्यासाठी निश्चित केलेला मानीव दिनांकापुर्वीची कागदपत्रे, ज्यामध्ये अनुसूचित जाती करीता सन 1950, विजाभज साठी सन 1961, इमाव व विमाप्र करीता सन १९६७ पुर्वीचे जातनोंदी असलेले अहिल्यानगर जिल्ह्रयातील पुरावे, मोडी भाषेतील पुरावे असल्यास मोडी लिपीवाचकाकडून लिप्यांतर केलेले नोंदणीकृत शपथपत्र, वारसनोंदीसाठी 7/12 उतारे, फेरफार किंवा कडईपत्रक उतारे, नमुना 3 व नमुना 17 चे नोंदणीकृत मुळ शपथपत्र, जात पडताळणी ऑनलाईन अर्जासाठी भरावे लागणारे ऑनलाईन शुल्क जात वैधता पडताळणीच्या शैक्षणिक प्रकरणासाठी शुल्क १०० रुपये, सेवाविषयक व निवडणूक कामासाठी ५०० रुपये शुल्क ऑनलाईन भरुन त्याची पावती व ऑनलाईन अपलोड केलेल्या कागदपत्रांचा सर्व जातीविषयक पुराव्यांची कागदपत्रे प्रस्तावासोबत समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. जातवैधता पडताळणीसाठी परिपूर्ण कागदपत्रे जमा केल्यास विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळते.

Ahilyanagar News : आठ महिन्यात 22 हजार जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण; विद्यार्थी व अर्जदारांना दिलासा Read More »

img 20250918 wa0001

Sawedi Plot Scam: सावेडी भूखंड प्रकरणः खरेदी झाली पण…, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी…?

Sawedi Plot Scam: अहिल्यानगर जिल्ह्यातील सावेडी तालुक्यातील स. न. २४५/ब १.३५ हे जमिनीचे खरेदी विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. महाराष्ट्र महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या प्रकरणात एकतर खोट्या खरेदी दस्तावेजांचा वापर करून जमिनीचे व्यवहार घडवून आणले गेले आहेत किंवा संबंधित अधिकारी प्रांताधिकारी, अपर तहसिलदार, मंडळ अधिकारी यांनी नियमांचे उल्लंघन करत या जमिनीच्या फेरफाराला न्याय्यतेचा मुखवटा दिला आहे, असा आरोप उभा राहिला आहे. दुसरे खरेदी खत झाले त्याबद्दल वाद नाही पण संशयित खरेदी खतावर कारवाई कधी, हा प्रश्न उभा राहिला आहे, अशा खरेदी खातांना पाठबळ मिळाले तर येणार कला सर्वसामान्य नागरिकांसाठी घोक्याची घंटा आहे. प्रकरणाचा तपशील सदर प्रकरण मौजे सावेडी ता. जि. अहिल्यानगर येथे स. नं. २४५/ब२ मधील फेरफार क्रमांक ७३१०७ मंजूर दिनांक १७/०५/२०२५ या संदर्भात सुरू आहे. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ०.६३ हे. आर असून, दुय्यम निबंधक अहमदनगर दक्षिण यांच्या दस्तावेज क्र. ४३०/१९९१, दिनांक १५/१०/१९९१ अन्वये घेतलेले खरेदी दस्तावेज खोट्या असल्याचे दिसून आले आहे. उप विभागीय अधिकारी अहिल्यानगर भागाकडे अर्ज दाखल करण्यात आला असता त्यानुसार चाचणी करण्यात आली. खरेदी देणार अब्दुल अजिज डायाभाई (वडील) आणि खरेदी घेणार पारसमल मश्रीमल शहा यांच्या दरम्यान व्यवहार घडवून आणला गेला, तरीही वाटपाच्या प्रमाणाप्रमाणे व चुक दुरुस्ती लेखाबाबत शंका निर्माण झाली आहे. कायद्याचे खुले उल्लंघन महत्त्वाची बाब म्हणजे, महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५०(२) नुसार नोटीस बजावणी न करता फेरफार केले जाणे पूर्णपणे अनियमित ठरते. अप्पर तहसिलदारांनी आणि संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी नोटीस टपालाद्वारे बजावणी न करता अत्यंत तातडीने, फक्त २० दिवसांत नोंद प्रमाणित करण्याची कारवाई घडवून आणली. यामुळे प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच, खरेदी दस्त क्र. २८८५४/२००२ व फेरफार क्र. २७०१८ प्रमाणे अजिज डायाभाई व साजिज डायाभाई यांना मिळकत दिल्याचे दाखवले आहे. मात्र, वाटपामध्ये व चुक दुरुस्तीमध्ये नावे भिन्न दाखवले गेले आहेत. यामुळे आता या प्रकरणामध्ये दस्तऐवज बनावट असल्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. अप्पर तहसिलदारांची गुप्त कारवाई सर्वसामान्य नागरिकांना सरकारी व्यवहारात नोटीस बजावणी करणे अनिवार्य असताना, अप्पर तहसिलदार स्वप्निल ढवळे यांनी प्रकरण जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे चर्चेसाठी पोहोचण्याऐवजी, स्वतःच एकाच दिवशी (१४/०८/२०२५) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तसेच सह दुय्यम निबंधकांना पत्र मारून व्यवहार पुढे नेण्याची कारवाई केली. ही कारवाई प्रकरणाचा फेरफेर करण्याऐवजी त्यात अधिकच संशयास्पदपणा निर्माण करते. याच वेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी वेळकाढू धोरण अवलंबून प्रकरणात कोणतीही तातडीने कारवाई न करता उलट जाणीवपूर्वक विलंब केला. या विळख्यात जमीन घोटाळा करणाऱ्या संशयित व्यक्तींना पाठबळ दिल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाची भूमिका : दोषपूर्ण आणि ढासळलेली उप विभागीय अधिकारी अहिल्यानगर भाग व अपर तहसिलदार यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई प्रस्तावित केली नाही. तसेच, कारवाई प्रस्ताव न सादर करणे म्हणजे घोटाळ्याची स्वीकार्यता मानण्यासारखेच ठरते. याव्यतिरिक्त प्रकरणी सुशासन आणि पारदर्शकतेचे पूर्ण उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८ अन्वये पुनर्विलोकनात घेऊन प्रकरणाची योग्य चौकशी व निर्णयाची गरज अधोरेखित करते. जनतेचा विश्वास फाटला सदर प्रकरणाच्या सतत मिडिया ट्रायलमुळे जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात सरकारच्या प्रशासनावर विश्वास हरवला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांनी बळकट आवाज उठवायला हवा. मात्र, प्रशासनाने स्वतःच अशा व्यवहारांमध्ये सामील होऊन परिस्थिती अजूनच विकृत केली आहे. तत्पर कारवाई आणि गंभीर पुनरावलोकन आवश्यक सावेडी भूमाफिया प्रकरणातील भ्रष्टाचाराची जमीनीवरची खोली समजून शासनाने तत्काळ कारवाई करावी लागेल. नियमांचे पालन, पारदर्शकता व समाजाची हितवृत्ती हा प्रत्येक अधिकाऱ्याचा कर्तव्य असले पाहिजे. शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रभावशाली व्यक्ती व भूमाफियांचा दबाव टाळून शासनाच्या न्यायालयीन प्रक्रियेला पूर्णपणे प्राधान्य द्यावे. “भूमी ही लोकांच्या सुरक्षिततेची दागिना असते, ती कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्यापासून मुक्त राहिली पाहिजे.” अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुनावणी पूर्ण करून दोषी अधिकार्यांविरुद्ध कडक कारवाई करणे अत्यावश्यक ठरेल, अन्यथा शासनाची कायदा अंमलबजावणीची प्रतिमा पूर्णपणे धूसर होण्याचा धोका निर्माण होईल.

Sawedi Plot Scam: सावेडी भूखंड प्रकरणः खरेदी झाली पण…, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी…? Read More »

img 20250915 wa0022

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश

Karanji Flood : अहिल्यानगर जिल्ह्यात रविवार रात्रीपासून पुन्हा एकदा मुसरधार पाऊस सुरू झाला आहे. यातच 15 सप्टेंबर पहाटे पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्यापही चार ते पाच लोक पुरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बचाव कार्याचे पथक सध्या करंजी मध्ये सतर्क आहे. पावसाचा कहर अहिल्यानगर जिल्ह्यात रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी, घाटशिरस, मढी या गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. घरात पाणी, गोठ्यातील जनावरे वाहून गेली, शेतीचे प्रचंड नुकसान असे संकट शेतकऱ्यांवर कोसळलं आहे. तलाव फुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथके गावांत दाखल झाली असून बचाव कार्य सुरू झाले आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 15 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश Read More »