DNA मराठी

ahmednagar news

FB IMG 1729577662269

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी  स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अपर तहसीलदार पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली ‌म्हात्रे आदी उपस्थित होते.

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी Read More »

IMG 20241019 WA0013

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी

Manoj jarange Patil :  मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की,  अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी Read More »

Ahmednagar Collector Office

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत.  वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Eknath Shinde

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा

Maharashtra Nominated MLC : राज्यात आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या मात्र त्यापूर्वी आज सात आमदार शपथ घेणार आहे. ज्याचा फायदा महायुतीसह भाजपला होणार आहे.   सात नामांकित एमएलसीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल आज या सात जणांना शपथ देणार आहे.  या सात एमएलसीमध्ये भाजपला मोठा फायदा झाला असून त्यांच्या वाट्याला जास्त जागा मिळाल्या आहेत. कोण होणार MLC? मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोटा निश्चित झाला आहे. भाजपला 3, शिवसेना शिंदे यांना 2 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील हे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह महाराज शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. उद्धव सरकारचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित 2020 च्या सुरुवातीला, तत्कालीन उद्धव सरकारने 12 एमएलसीचे नामनिर्देशन करण्याची फाइल राज्यपालांकडे पाठवली होती, ही फाईल तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी परत केली होती. त्यावर उद्धव गटाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, त्यावर सुनावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने 14 ऑक्टोबर रोजी 7 आमदारांच्या फायली राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठवल्या होत्या. ज्याला राज्यपालांनी मान्यता दिली. शपथ कधी होईल राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देतील.

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा Read More »

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : … नाहीतर बांगलादेशसारखी अवस्था होणार, हिंदूंनी संघटित राहावे, विजयादशमीच्या निमित्ताने भागवतांचा संदेश

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विजयादशमी सणानिमित्त आरएसएस मुख्यालयमध्ये शस्त्रपूजन करून हिंदूंना संघटित व्हायचे आवाहन केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  मोहन भागवत यांनी संदेशात बांगलादेशपासून पाकिस्तानपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता हिंदूंना संघटित व्हावे लागेल. इस्रायल-हमास युद्धालाही त्यांनी चिंतेचे कारण म्हटले आहे. भागवत म्हणाले, लोकांच्या राष्ट्रीय चारित्र्यामुळेच देश महान बनतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने हे वर्ष महत्त्वाचे आहे. इस्रायल-हमास युद्ध चिंतेचे कारण आहे. गेल्या काही वर्षांत भारताची विश्वासार्हता वाढल्याने जगात भारत अधिक मजबूत आणि आदरणीय बनला आहे, असे प्रत्येकाला वाटते.  संघप्रमुख म्हणाले की, बांगलादेशमध्ये भारताला धोका असल्याचा संदेश पसरवला जात आहे. भारताकडून धोका असेल तर पाकिस्तानला सोबत घ्यावे, अशी चर्चा बांगलादेशात सुरू आहे. कारण पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, ती भारताला रोखू शकते. तर भारताने बांगलादेशच्या स्थापनेसाठी सर्व काही केले. ही चर्चा कोण आयोजित करत आहे? बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार बांगलादेशातील दंगलींमुळे हिंदू समाजावर जे अत्याचार होत होते, ते पुन्हा पुन्हा एकत्र आले आणि ते वाचले. हिंदू समाजाने संघटित राहिले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे. अत्याचार सहन करणे ही दुर्बलता आहे. आपली अवस्था बांगलादेशसारखी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं देखील यावेळी ते म्हणाले.  तसेच कोलकाता येथील डॉक्टरांसोबत झालेल्या क्रूरतेचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, कोलकाता आरजी कार हॉस्पिटलमध्ये जे घडले ती लाजीरवाणी  घटना आहे.

Mohan Bhagwat : … नाहीतर बांगलादेशसारखी अवस्था होणार, हिंदूंनी संघटित राहावे, विजयादशमीच्या निमित्ताने भागवतांचा संदेश Read More »

IMG 20241012 WA0006

Yeh Re Yeh Re Paisa 3 : “ये रे ये रे पैसा 3” नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार

Yeh Re Yeh Re Paisa 3 :  मराठी चित्रपटसृष्टीत ‘ये रे ये रे पैसा’  मल्टिस्टारर चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल ‘ये रे ये रे पैसा 3’ बहुचर्चित आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, नव्या वर्षात 3 जानेवारी 2025 रोजी ‘ये रे ये रे पैसा 3’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.  अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो  या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून,  सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे  निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.  पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून भेटीस येणार आहे.  संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळं, काहीतही हटके पाहण्याची पर्वणी असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटानं तो अनुभव दिला आहे. ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा 2’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळी, मनोरंजक होणार आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे. त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची जुगलबंदीही पाहता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी ‘ये रे ये रे पैसा 3’ सज्ज होत आहे.

Yeh Re Yeh Re Paisa 3 : “ये रे ये रे पैसा 3” नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार Read More »

IMG 20241011 WA0007

Ahmednagar Latest News: रामगिरी महाराजांवर कारवाई करा नाहीतर…, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारला इशारा

Ahmednagar Latest News: पैगंबर मोहम्मद यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि मुस्लीम समाजाला धमकी देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि मुस्लिम धर्मगुरू सलमान अजहरी यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आज समस्त मुस्लीम समाज व उलेमा शहर अहमदनगर यांच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच प्रशासनाकडून यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील मुस्लिम समाजाकडून देण्यात आला आहे.  मुस्लिम समाजाने या निवेदनामध्ये महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि नितेश राणे यांच्या विरोधात दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये कलम 61 (1), 61(2), 192, 299 भारतीय न्याय संहिता 2023 तसेच 15 (1) बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अॅक्ट 2019 अन्वये कलमांची वाढ करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले होते तेव्हा मुंबई पोलीस आयुक्ताने आरोपी विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

Ahmednagar Latest News: रामगिरी महाराजांवर कारवाई करा नाहीतर…, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारला इशारा Read More »

Ratan Tata

Ratan Tata: रतन टाटा यांचा शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार, राज्यात एक दिवसीय दुखवटा जाहीर

Ratan Tata:  रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. टाटा समूहाला जागतिक स्तरावर नामांकित समूहात रूपांतरित करण्याचे श्रेय टाटा यांना जाते. बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय तिरंगा अर्ध्यावर फडकणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही. दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील वरळी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव एनसीपीए येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली. दर्शनासाठी येणाऱ्यांना तेथे पार्किंगची सुविधा नसल्यास पोलिसांच्या सूचनांचे पालन करून त्यांची पार्किंग व्यवस्था तपासावी लागेल, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त तैनात असेल.

Ratan Tata: रतन टाटा यांचा शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार, राज्यात एक दिवसीय दुखवटा जाहीर Read More »

Ratan Tata

Ratan Tata:  उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, ICU मध्ये सुरु होता उपचार

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.  सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वयाशी संबंधित आजारांमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी बरोबर आहे. अशी माहिती एक्सवर रतन टाटा यांनी दिली होती.  रतन टाटा यांनी मार्च 1991 ते डिसेंबर 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये, रतन टाटा यांना भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. टाटाच्या दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारातून ग्रुपने दूरसंचार, रिटेल आणि ऑटो यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हरची खरेदी ही टाटाच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक होती, जो टाटा ग्रुपच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण होता.

Ratan Tata:  उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, ICU मध्ये सुरु होता उपचार Read More »

Screenshot 2024 10 07 11 56 25 44 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

… म्हणून टीव्ही शो CID अचानक बंद झाला, कारण जाणून व्हाल थक्क

CID Show:  टिव्हीवर सर्वात लोकप्रिय शो पैकी एक असणारा सीआयडी अचानक बंद झाल्याने चाहते निराश आहे. काही दिवसापूर्वी सीआयडी 20 वर्षे चालल्यानंतर अचानक बंद झाला होता.   मात्र, आता एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटमने अचानक ऑफ एअर झाल्याचा खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कारणामुळे सीआयडी अचानक बंद  शिवाजी साटम म्हणाले, ‘त्या काळात आम्ही चॅनेलला विचारायचो की ते हा शो का बंद करत आहेत. या शोचा टीआरपी चांगलाच होता. टीआरपीमध्ये आम्ही केबीसी समोरासमोर होतो. त्यानंतर शोच्या टीआरपीमध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली, पण कोणत्या शोच्या टीआरपीमध्ये घसरण होत नाही. शो बंद करण्यापूर्वी त्याने त्याच्या शेड्यूलमध्येही छेडछाड केली. पूर्वी हा शो रात्री 10 वाजता ऑन एअर व्हायचा. यानंतर ते रात्री 10:30 वाजता किंवा कधी कधी 10:45 वाजता प्रसारित करू लागले. यामुळे लोक ते कमी पाहू लागले.  मला वाटते की चॅनेलला शोच्या निर्मात्यांशी समस्या होती, परंतु आमच्यासाठी ते केवळ निष्ठेबद्दल नव्हते. ते मैत्रीबद्दल होते. यामुळे आम्ही एकत्र पडलो.   सीआयडी 1998 मध्ये सुरू झाली CID हा क्राईम शो 21 जानेवारी 1998 रोजी सुरू झाला होता. हा शो बीपी सिंग यांनी तयार केला होता आणि फायरवर्क्स प्रॉडक्शनने निर्मिती केली होती. यामध्ये शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्नची भूमिका, आदित्य श्रीवास्तव यांनी सीनियर इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका, दयानंद शेट्टी यांनी सीनियर इन्स्पेक्टर दया, दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टर फ्रेडरिकची भूमिका तर नरेंद्र गुप्ता यांनी डॉ. साळुंखे यांची भूमिका साकारली आहे.   20 वर्षे सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर हा शो 27 ऑक्टोबर 2018 रोजी बंद झाला. शोचे सुमारे 1547 भाग टेलिकास्ट झाले होते.

… म्हणून टीव्ही शो CID अचानक बंद झाला, कारण जाणून व्हाल थक्क Read More »