DNA मराठी

Ratan Tata: रतन टाटा यांचा शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार, राज्यात एक दिवसीय दुखवटा जाहीर

Ratan Tata:  रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. टाटा समूहाला जागतिक स्तरावर नामांकित समूहात रूपांतरित करण्याचे श्रेय टाटा यांना जाते. बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय तिरंगा अर्ध्यावर फडकणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही.

दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील वरळी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळी 10 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव एनसीपीए येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली. दर्शनासाठी येणाऱ्यांना तेथे पार्किंगची सुविधा नसल्यास पोलिसांच्या सूचनांचे पालन करून त्यांची पार्किंग व्यवस्था तपासावी लागेल, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त तैनात असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *