DNA मराठी

मोठी बातमी! सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलिस अधीक्षक

Ahilyanagar – एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरचे पोलीस (Rakesh Ola) अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज राज्य सरकारने अधिकृतरीत्या याबाबतची माहिती दिली आहे.

राकेश ओला(Rakesh Ola) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असताना कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केली होती. आता त्यांना बृहन्मुंबईमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, त्यांच्या जागी सोमनाथ घार्गे (Somnath Gharge)यांची अहिल्यानगरच्या नव्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे हे यापूर्वीही विविध महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *