Santosh Deshmukh Murder Case: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज खंडणी प्रकरणात सीआयडी पोलीस कोठडीत असणाऱ्या सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आज मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आवादा कंपनीला कोणाच्या सांगण्यावरून खंडणी मागितली होती? त्याने खंडणीची काही रक्कम घेतली आहे का? याबाबत सध्या पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेसह वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे. याबाबत देखील त्याच्याशी चौकशी होणार आहे.
तर दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.