Rahul Gandhi on PM Modi: लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर होत असलेल्या चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत असे सांगावे असे आव्हान केले आहे.
या चर्चेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. ट्रम्प यांनी 29 वेळा म्हटले आहे की आम्ही युद्ध थांबवले आहे. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत. जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या 50 टक्केही हिंमत असेल तर ते येथे सांगतील. असं राहुल गांधी म्हणाले.
तसेच सरकारने सांगितले की ही कारवाई पहाटे 1.27 वाजेपर्यंत सुरू होती. पाकिस्तानला 1.35 वाजता फोनवरून माहिती देण्यात आली. ही माहिती थेट पाकिस्तानला का देण्यात आली? तुम्ही पाकिस्तानला सांगितले की तुम्हाला लढायचे नाही. सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. आम्ही 30 मिनिटांत शरणागती पत्करली. सरकारकडे लढण्याची इच्छाशक्ती नव्हती. अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केल.
तर भारतीय सैनिक वाघ आहेत. वाघांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. सैन्याच्या वापरासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. जर सैनिकांना देशासाठी काम करायचे असेल तर त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल. मी राजनाथ सिंह यांचे भाषण ऐकले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना 1971 शी केली. राहुल म्हणाले की, 1971 मध्ये सरकारकडे इच्छाशक्ती होती. 1971 मध्ये आम्ही अमेरिकेचे ऐकले नाही. असा टोला देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लावला.
मी पाकिस्तान आणि चीनला वेगळे ठेवण्याचे म्हटले होते. सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले. खरी लढाई चीनशी होती. पहलगाम हल्ल्यामागे मुनीरचा हात होता. पाकिस्तान आणि चीनने हातमिळवणी केली. सरकारला वाटले की आपण पाकिस्तानशी लढत आहोत. प्रत्यक्षात आपण पाकिस्तान आणि चीन दोघांशीही लढत आहोत. असं देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.






