Delhi Assembly Election: पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएम देखील उमेदवार देणार असल्याची घोषणा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी पक्षाकडून मुस्तफाबादमधून ताहीर हुसेन यांच्या नावाची घोषणा देखील पक्षाकडून करण्यात आली आहे. माहितीनुसार एआयएमआयएम दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 10 जागांवर निवडणुक लढवणार आहे.
एआयएमआयएमच्या या घोषणेनंतर सत्ताधारी आम आदमी पक्षाला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
तर दुसरीकडे एआयएमआयएमने केवळ ताहिर हुसैन यांना तिकीट दिले नाही तर 18 डिसेंबर रोजी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या मतदारसंघात रॅलीही काढली. मुस्लीमबहुल मुस्तफाबाद येथे रॅली काढताना ओवेसी म्हणाले की, राजकारणात मुस्लिमांना कोणीही नेतृत्व देऊ इच्छित नाही. त्यांचे नेतृत्व कोणालाही सहन होत नाही. ते म्हणाले की भारतातील प्रत्येक समुदायाला राजकीय नेतृत्व आहे परंतु मुस्लिमांसाठी राजकीय नेतृत्व तयार करण्यात लोकांना अडचणी येतात.
एआयएमआयएम दिल्लीतील दहा विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मुस्तफाबाद या एका जागेसाठी ताहिर हुसेन यांची नावे आधीच जाहीर करण्यात आली आहेत. पक्ष लवकरच 9 जागांची घोषणा करेल. ओवेसी यांचा पक्ष सीलमपूर, बाबरपूर, बल्लीमारन, चांदनी चौक, ओखला, जंगपुरा, सदर बाजार, मतिया महल आणि करावल नगर या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.
आम आदमी पक्षाने 10 पैकी 9 जागा जिंकल्या
दिल्लीचे राज्य प्रभारी इम्तियाज जलील म्हणाले की, पक्ष सर्वेक्षण करत आहे जेणेकरून योग्य उमेदवार उभे करता येतील. वृत्तांवर विश्वास ठेवला तर AIMIM ने ज्या 10 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यापैकी 9 जागांवर मुस्लिम बहुल आहेत. या जागा आम आदमी पक्षाकडे आहेत.