DNA मराठी

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

img 20250723 wa0003

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधक करत आहे.

तर दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जुगारी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर पठाण, सरपंच शरद पवार, फय्याज तांबोली, अनिस शेख, आरिफ पटेल, जावेद शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमान देखील केलेला आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी, कर्जमाफी वरील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. एका कृषिमंत्रीने शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले.

तर नुकतेच कृषिमंत्री कोकाटे विधान परिषदेत अधिवेश सुरु असताना चक्क मोबाईलवर रम्मीचा जुगार खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे भावना दुखावल्या गेल्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *