Dnamarathi.com

Maharashtra Election: संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमतासह महायुती सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने निवडणुकीत 131 जागांवर बाजी मारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी इच्छा देखील आरएसएसकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाले आहे आणि 3 जागांवर इतरांनी बाजी मारली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभासह झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली असून पुन्हा एकदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार आहे. त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा देखील केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *