DNA मराठी

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….!

Maharashtra Election: शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा शेवगांव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली मेळावा पार पडला.

शेवगांव-पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंढे आणी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी निर्धार मेळाव्याचे भव्य आयोजन करून अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.

 मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असुन विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यांनी केले.

 यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसारवाडे, बाळासाहेब सोनवने, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे, संजय मरकड सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *