DNA मराठी

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू

Maharashtra Accident:  सातारा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला.

सातारा-लोणंद महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील आंबवडे वाघोलीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात सोमवारी (12 ऑगस्ट) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.

या अपघातात कंटेनरला आग लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना पोलिसांनी तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक पूर्ववत केली.

या दुर्दैवी घटनेत कंटेनर जळून खाक झाला असून आयशर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे. 

आयशर टेम्पो किंवा कंटेनर चालक झोपी गेल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा तपास वाठार पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *