Dnamarathi.com

LPG Gas Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागू नये मात्र त्यापूर्वीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या नवीन दरानुसार, आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1797 रुपये झाली आहे.

कोणत्या शहरात गॅसच्या किमती किती कमी झाल्या?
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 फेब्रुवारीपासून 1804 रुपयांवरून 1797 रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत 1911 रुपयांवरून 1907 रुपयांवर आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1756 रुपयांवरून 1749.50 रुपयांना उपलब्ध आहे. आजपासून चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1959.50 रुपये आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरचा दर
आज घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत, 14 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर अजूनही 803 रुपयांच्या जुन्या किमतीत उपलब्ध आहे. लखनौमध्ये या एलपीजी सिलेंडरची किंमत 810.50 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 802.50 आहे. चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 818.50 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *