DNA मराठी

Ahilyanagar Crime : राहुरीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 11 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त

img 20261120 wa0002

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी हद्दीत मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक उघडकीस आणली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ११ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी राहुरी परिसरात रवाना झाले होते. दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गस्तीदरम्यान पथकाला बर्डे वस्ती, कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील प्रवरा नदीपात्रातून चोरून वाळूची वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानंतर पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई केली.

ताब्यात घेतलेले आरोपी:

१. जालींदर राजेंद्र लकारिया (वय २८, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर)

२. अक्षय सुनील लकारिया (वय २६, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर)

३. अजय रंजित लकारिया (वय २६, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹ ११,१५,०००):

विना क्रमांकाचा अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (किंमत ₹ ५,००,०००)

टाटा कंपनीचा विना क्रमांक असलेला टेम्पो (किंमत ₹ ६,००,०००)

टेम्पोमध्ये भरलेली चोरटी वाळू (किंमत ₹ १५,०००)

सदर प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय पवार, अजिनाथ पाखरे आणि रणजीत जाधव यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *