DNA मराठी

Ketan Agarwal : होणारी पत्नीनेच केला खून; केतन अग्रवाल प्रकरणात आत्तापर्यंत सर्वात मोठा खुलासा

ketan agarwal

Ketan Agarwal : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून पाय घसरल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा 18 जून रोजी मृत्यू झाला होता. तर आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून होणाऱ्या पत्नीनेच (सिया गोयल) केतन अग्रवालची आपल्या प्रियकराच्या (चेतन चौधरी) मदतीने हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावर टर्किंग करत असताना पाय घसरल्याने 350 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (B.N.S.S. 194) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात तपास करत असताना सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सखोल चौकशी करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (B.N.S.) कलम 103 आणि 61(2) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमसंबंध अन् हत्या

सिया गोयलचे प्रेमसंबंध चेतन चौधरीसोबत असल्याने तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. कटाचा भाग म्हणून सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे सिया आणि चेतनने केतनची हत्या केली.

तर दुसऱ्याकडे या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी सिया गोयलच्या कुटुंबियांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. विशाल अग्रवाल यांनी सियाच्या प्रेमसंबंधाबाबत सर्वकाही माहिती असून देखील तिच्या कुटुंबियांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावा केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *