Dnamarathi.com

Indian’s Spending : नुकतंच सोशल मीडियावर एक सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या सर्वेक्षणात भारतीय लोकांच्या खर्चाबाबत धक्कादायक माहिती शेअर करण्यात आली आहे. 

सर्वेक्षणानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला आहे मात्र लोकांचा अन्नावरील खर्च कमी झाला आहे. या सर्वेक्षणानुसार आता भारतीय लोक खाण्यापिण्याऐवजी इतर गोष्टींवर जास्त खर्च करताना दिसत आहे. 

कपडे आणि मनोरंजनावर खर्च  

या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला आहे. लोक आता कपडे, टेलिव्हिजन सेट आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर जास्त खर्च करत आहे. यामुळे बाजारात खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

 या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा कमी झाला होता. ग्रामीण भागातील मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा 2011-12 मध्ये 53 टक्के होता, तो आता 46.4 टक्के आहे. तर शहरी भागात मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा या कालावधीत 42.6 टक्क्यांवरून 39.2 टक्क्यांवर आला आहे. या कालावधीत शहरी भागात अखाद्य पदार्थांचा वाटा  57.4 टक्क्यांवरून वाढून चक्क 60.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर 47 टक्क्यांवरून चक्क 53.06 टक्क्यांवर ग्रामीण भागात आहे.  

दरडोई ग्राहक खर्चात वाढ

हे जाणून घ्या कि, ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान हे सरकारी सर्वेक्षण करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, 2011-12 मध्ये सुमारे 2,630 रुपये सरासरी मासिक दरडोई ग्राहक खर्च होता तो आता अंदाजे 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर  ग्रामीण भागात हा आकडा 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत गेला आहे. 

सर्वेक्षणाच्या या आकडेवारीनुसार भारतीय लोक आज अन्नावर कमी तर प्रवास आणि इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि, हा डेटा सरकार किरकोळ महागाई आणि GDP मोजण्यासाठी वापरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *