DNA मराठी

Ahmednagar News:  ते विधान रोहित पवारांसाठी सूचक असेल- राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News:  राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. 

आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई होईल असं बोललं जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्यावेळीच फूट पडली असती असा गौप्यस्फोट केलाय .

यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आप्पासाहेब पवार आणि विखे कुटुंबाचे जवळचे संबंध होते, आप्पासाहेब हे स्वाभिमानी जगणारे होते त्यामुळे त्याचा राजकारणावर कुठलाही परिणाम झाला नाही .

त्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब सक्रिय राजकारणात होते त्यामुळे कदाचित त्यांचा रोहित पवार यांना इशारा असेल जास्त धावपळ करू नको नाहीतर अजित पवार होणे तुझी ही फसगत होईल असं त्यांना सुचवायचं असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.