Manoj Jarange Narco Test : ओबीसीमधून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे.
पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर विधिमंडळात सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद पाहायला मिळाले.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात मोठा निर्णय घेत एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना अटक करून त्यांचा नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे.
याच बरोबर पाटील यांच्या विधानामागे कोण आहे? याची देखील एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.
तर एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, मी मराठा समाजाचे काम करत आहे आणि ते सत्तेचा वापर. आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस गोळी चालवणार आहेत मात्र मी मी कुठेच अडकू शकत नाही. कारण मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत.