Guillain Barre Syndrome : कोरोनानंतर राज्यात आता पुन्हा एका नवीन आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला असून केंद्राचं पथक राज्यात दाखल झाले आहे.
या आजाराचं नाव गुलेन बॅरी सिंड्रोम असे आहे. पुण्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करतो. या आजाराचा फटका नवजात बालकांना देखील बसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे या आजारावर उपचार करता येत आहेत.
गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे
हे लक्षात घ्या की गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे अचानक दिसतात. विशेष म्हणजे ही लक्षणे काही दिवसांत किंवा आठवडाभरात झपाट्याने वाढतात. सामान्य लक्षणांमध्ये अंग दुखणे, चालताना तोल जाणे, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, चेहरा सुजणे, चालताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे यांसारखी लक्षणे या आजारात दिसतात.
उपचार
उपचारामध्ये इंट्राव्हेन्स इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज यांसारख्या इम्युनोथेरपीचा समावेश असून मज्जातंतूंचे नुकसान कमी करण्यासाठी या उपचारपद्धतीचा आधार घेण्यात येतो.