Supreme Court: ‘लॉटरी किंग’ प्रकरणात सुनवाई करताना आज देशातील सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे.
या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार आता ईडीला मोबाईल आणि लॅपटॅाप तपासण्याची अनुमती मिळणार नाही. तसेच ईडीला मोबाईल, लॅपटॅापचा ॲक्सेस देता येणार नाही शिवाय डेटा कॅापी करता येणार नाही.
याच बरोबर आता ईडीला धाड टाकल्यावर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
नोव्हेंबरमध्ये “लॉटरी किंग” सँटियागो मार्टिन, त्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.