Dhananjay Munde: बीड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचे ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाही मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत यावेळी नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केले आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात असल्याचे देखील यावेळी बोलताना शास्त्री म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी रात्रीच भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी प्रदीर्घकाळ त्यांची चर्चा देखील झाली. एवढे बोलताना शास्त्री म्हणाले की खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत मुंडेंची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी नाही. आज मीडिया द्वारे जाते वाट पसरवला जात आहे. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो तसेच त्यांच्या पक्षाचे नेत्यांना देखील हे माहिती आहे मात्र हा विषय किती तानायचा हा ज्याने त्याने ठरवावा. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले.
समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत असं शास्त्री म्हणाले.