Dnamarathi.com

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागले आहे.

माहितीनुसार भाजप केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सहमती दर्शवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे आता देखील भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून सध्या ते काळजीवाहक मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्यामुळे बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याने भाजपकडून एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्याची तयारी आहे मात्र एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पुढील एक-दोन दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपने 131 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *