Abhijit Deepke : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर कोकरोच जनता पार्टीच्या पुढील वाटचालीबाबत सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आज नवा वाद निर्माण झाला. पक्षाच्या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही, असा आरोप करत गुजरातमधील अहमदाबाद येथील मनीषा ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांनी पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या घरासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू केले.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, जंतर-मंतर आंदोलनादरम्यान त्यांनी पोलिसांचा मार सहन केला, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, मात्र बैठकीसाठी केवळ कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाच निमंत्रित करण्यात आले. आंदोलनात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनामुळे दिपके यांच्या घरासमोर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलिसांचीही हालचाल वाढली. या प्रकरणावर अभिजीत दिपके किंवा कोकरोच जनता पार्टीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दोन्ही बाजूंची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.






