DNA मराठी

राजकीय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. “मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे. याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्… Read More »

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे. देशात समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड बनणार आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केले जाईल. हे राज्याबाहेर राहणाऱ्या रहिवाशांना देखील लागू होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी धर्म, लिंग, जात किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव न करता सुसंवादी समाजाचा पाया रचेल. यामुळे सर्व लोकांना समान अधिकार मिळतील. कोणाविरुद्धही भेदभाव केला जाणार नाही. आम्ही आमचे वचन पूर्ण करत आहोत. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हे याचे एक उदाहरण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत उभा आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री धामी यांनी पुष्टी केली होती की जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केला जाईल. यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले होते की सरकार यूसीसी लागू करण्यास वचनबद्ध आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले गृहपाठ पूर्ण झाला आहेधामी म्हणाले होते की राज्य सरकारने त्यांचे “गृहपाठ” पूर्ण केले आहे. जानेवारी 2025 पासून राज्यभरात यूसीसी लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ते म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही त्यावर प्राधान्याने काम केले. युसीसीचा मसुदा तयार होते. पण एक कायदा आणला गेला. आता आम्ही सोमवारी ती वचनबद्धता पूर्णपणे आणि औपचारिकपणे पूर्ण करणार आहोत.” “हे पंतप्रधानांच्या एकसंध भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल जिथे कोणत्याही धर्म, लिंग, जात किंवा समुदायाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा Read More »

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले Read More »

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे  अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराडला मोठा धक्का! करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त

Walmik Karad : वाल्मिक कराड याच्यावर आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होत आहे आणि यातूनच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचेही बोलले जात आहे. पण सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली आहे. याला कारण आहे त्याची संपत्ती. मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराड, त्याची पत्नी आणि मुलांच्या नावावर राज्यात विविध ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. साधा घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराड कडे इतकी संपत्ती कुठून आणि कशी आली? याचे कोडे अजूनही उलगडले नाही. पण आता वाल्मिक कराडची ही सर्व संपत्ती एसआयटीने जप्त करण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज देखील दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केला आहे. त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे बोलले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी खूप मोठा धक्का ठरु शकतो. याआधी सीआयडीने कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच आता एसआयटीने कराडच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मोठा धक्का! करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त Read More »

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत 100 दिवसांमध्ये सर्व विभागांनी मिळून किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या 7 कलमी कार्यक्रमांची ‘मिशन 100 दिवस’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमबजावणी करण्यात यावी. महसूल विभागामार्फत विद्यार्थी-विद्यार्थींनींना विविध प्रकारचे एक लाख दाखले देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे इतर शासकीय विभागांनीही त्यांच्या सेवा देण्याचे नियोजन करावे. प्रत्येक कार्यालय, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. कार्यालयातील दस्तऐवज सहागठ्ठे पद्धतीनूसार ठेवण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा. भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या विकासामध्ये विभागाचे योगदान असलेल्या ब्लॉगची निर्मिती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम तयार करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गतची कामे प्राधान्याने करत नागरिकांना विहित मुदतीमध्ये सेवा देण्यात याव्यात. डॅशबोर्डवर एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात विविध विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची माहिती अभिनव पहल या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी

Walmik Karad : खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी विष्णू चाटे च्या माध्यमातून मागितली असल्यास आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कंपनी या प्रकरणाची तक्रार 11 डिसेंबर रोजी दिली होती. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडची एसआयटी कोठडी संपणार असल्याने बीड सत्र न्यायालयात या प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. काल 21 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ 29 नोव्हेंबरचा असल्याचा सांगण्यात येत आहे. याच दिवशी वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाठेला भेटायला त्याच्या कार्यालयामध्ये गेला होता तेव्हाचा सीसीटीव्ही फुटेझ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपी देखील दिसत आहे.त्यामुळे आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी Read More »

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Narhari Zirwal : समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, उत्तम दर्जाचे व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शिवांजली कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मूरकुटे, रंगनाथ पवार, डॉ.बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले, नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे हा त्यांचा अधिकार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या अनेक घटना घडतात. अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करत अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून सामान्यांना निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पाटील परिवाराने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचीद्वारे खुली करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणदानाच्या त्यांच्या या पुण्याच्या कार्यात त्यांना भविष्यकाळात आवश्यक असलेली सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही झिरवाळ यांनी दिली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराड येणार अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार मुलावर गुन्हा?

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विजय ठरलेल्या वाल्मिक कराडला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकते. सोलापूर न्यायालयात सुशील कराडविरुद्ध मॅनेजरच्या घरात घुसून मॅनेजर आणि मुलीला मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली असून जिल्हा-सत्र न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. त्यामुळे आज या प्रकरणात न्यायालय निकाल देऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद दाखल करावी का? याबाबत न्यायालय आदेश देणार आहे. या आदेशाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या प्रकरणात जर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर आधीच अडचणीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या आणखी अडचणी वाढू शकतात. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी वाल्मिक कराडची संपत्ती सापडल्याने त्याच्यावर ईडी कारवाई करणार का? याबाबत देखील आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड येणार अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार मुलावर गुन्हा? Read More »