DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी!

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा  व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते.  यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तानां शासनाने जमिनी देण्याचे सोपास्कार केले मात्र अद्यापही अनेक जमिनी या भोगवाटा २ मध्ये असून त्यात वन विभागांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे.   यामुळे त्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजना राबविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनी ह्या १९७३ पुर्वीच्या दिल्या गेल्याने त्यातील अनामत रकमा रखडल्यामुळे या जमीन शासन जमा केल्या जाणार आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठऊन अशा जमिनीवरील तत्कालीन धोरणातील १०० टक्के, ७५ टक्के अनामत रक्कम भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदारांनी केली.  वन अधिनियम १९८० अस्तितवात येण्यापुर्वी वाटप केलेल्या जमिनी भोगवाटा २ वर्गातील जमिनी सरकट वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात. तसेच रहिवाशी प्रयोजनातील वाटप करण्यात आलेले भुखंड आणि पुनर्वसन गावठाणातील जमिनी नियमाकुल करण्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. या सर्व मागण्याच्या बाबतीत सखोल चर्चा होऊन दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसलू, मदत व पुनर्वसन आणि वन विभागाला निर्देश दिले.  या बैठकीला मंत्रालयातील दालनात महसूल व मदत व पुनर्वसन विभागांच्या मंत्र्यांसह आमदार श्रीमती मोनिका राजळे आणि महसूल, मदत पुनर्वसन व वन विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  तर दृकश्राव्य माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दिराम सालीमठ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! Read More »

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम

आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Rohit Pawar : जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.  चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉ. भास्कर मोरे याला 24 तासात अटक करण्याची मुदत संपली 100 घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.   महिला आयोगाकडून दखल रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या  अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे.  आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Read More »

kitchen Tips :  चकचकीत स्वयंपाकघर हवे असल्यास ‘या’ 6 टिप्स अवलंबवा

Kitchen Tips : आपल्याला चकचकीत स्वयंपाकघर आवडतं पण याला चकचकीत करण्यासाठी लागणारी मेहनत आणि एनर्जीचा वैताग येतो.  त्यासाठी आम्ही आपल्याला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याला अवलंब करून आपण आपल्या स्वयंपाकघराला स्वच्छ आणि चकचकीत ठेवू शकता.  स्वयंपाकघराची स्वच्छता करणं म्हणजे अक्षरशः थकवा येतो. आपण तासंतास आपला वेळ स्वयंपाकघरात घालवतात. दररोज स्वच्छ करून देखील बघा तेव्हा किचन घाण आणि पसरलेलंच असत. हे बघून फार चिडचिड होते.  या लेखमध्ये आम्ही आपल्याला काही अश्या सोप्या टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपल्याला किचन स्वच्छ करणं सहज आणि सोपं वाटेल.  किचनच्या टाइल्स  उष्णता आणि स्वयंपाक केल्यामुळे टाइल्स चिकट आणि घाण होतात. हे स्वच्छ करणं म्हणजे मोठा प्रश्न असतो. टाइल्स लहान असो किंवा मोठे ते घाण होतातच. आता ह्यांना स्वच्छ करणं सोपं आहे. काय करावं  एका स्प्रेच्या बाटलीत 1 कप व्हिनेगर सह 1 ¼ कप बेकिंग सोडा मिसळा. आता टाइल्सवर या लिक्विडचा स्प्रे करून टूथब्रशने घासून घ्या.  घाण निघत नसल्यास या घोळात ½ कप लिक्विड साबण मिसळा  आपल्या किचनच्या वेंटला नवे बनवा आपल्या किचनच्या वेंट मध्ये सर्वात जास्त तेल जमा होतं. हे गॅस च्या वर असल्यामुळे उष्णतेमुळे तेल लवकर एकत्र करते. काय करावं   एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पाणी तापत ठेवा आणि वेंट बाहेर काढा.  हळू हळू या मध्ये ¼ कप बेकिंग सोडा मिसळा थोड्याच प्रमाणात मिसळा. या मिश्रणाला 60 सेकंद पर्यंत उकळू द्या. आपल्याकडे लहान भांड असल्यास त्याला पालटी करा आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक बाजू 60 सेकंदासाठीच घोळात असावी.  चॉपिंग बोर्डाची स्वच्छता  लाकडाचे बोर्ड कापण्यासाठी आणि चॉप करण्यासाठी चांगले असतात. पण त्यांचा पृष्ठभाग सच्छिद्र असल्यामुळे त्याचा वर त्वरितच डाग पडतात आणि त्यामधून वास येऊ लागतो. काय करावं बोर्ड वर मीठ भुरभुरा. एक लिंबू घ्या त्याला अर्ध चिरून घ्या.  आता या लिंबाने बोर्डाला मागून पुढून पुसून घ्या डाग आणि वास नाहीसे होतील. जळालेले भांडे स्वच्छ करणं आपण गॅसवर दूध ठेवून विसरून गेला आहात किंवा आपण साखरेला केरॅमल बनविण्याचा प्रयत्न केला असाल आणि साखर भांड्याला चिटकली असल्यास, परिणाम भांडंं जळतंं. तर काही उपाय करून आपण जळालेल्या भांड्यांना स्वच्छ करू शकता. काय करावं   जळालेल्या भांड्यात 1 कप पाणी आणि 1 कप व्हिनेगर घाला. या घोळाला उकळू द्या. उकळल्यावर भांड सिंक मध्ये ठेवा आणि या मध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घाला.  आता मिश्रण जमणे बंद झाल्यास कंटेनर रिकामे करा आणि कडक स्पॉंजने स्वच्छ करा. जळालेले भांडे स्वच्छ झाले नसल्यास अतिरिक्त बेकिंग सोडा घाला.  स्वयंपाकघरातील स्पॉंज स्वच्छ करावं स्वयंपाकघर स्वच्छ करताना आपण स्पॉंज स्वच्छ करायला विसरतो, ज्यामुळे बॅक्टेरिया एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणून दिवसातून एकदा तरी ह्याची स्वच्छता करावी. काय करावं   स्पॉंज मऊ करण्यासाठी आणि त्यामधून घाण आणि तेल काढण्यासाठी स्पॉंज एक ग्लास पाण्यासह काही मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.  जळालेले गॅस बर्नर स्वच्छ करणे  बऱ्याचदा जळालेले स्टोव्ह किंवा बर्नर गरम असल्यामुळे आपण स्वच्छ करतं नाही पण यासाठी सर्वात उत्तम उपाय अमोनिया आहे जे उत्तम ग्रीस रिमूव्हर आहे. म्हणून आपल्या गॅस बर्नरच्या सभोवताली ग्रीसचे डाग काढण्यासाठी याचा वापर करावा. काय करावं  एका झिपलॉक बॅगेत ¼ कप अमोनिया घाला. या पेक्षा जास्त टाकू नका. या मध्ये आपल्या गॅस बर्नरला टाकून ठेवा आणि बॅग लॉक करा. बर्नरला किमान 8 ते 9 तास असेच पडू द्या. स्पॉन्जच्या मदतीने पुसून घ्या.

kitchen Tips :  चकचकीत स्वयंपाकघर हवे असल्यास ‘या’ 6 टिप्स अवलंबवा Read More »

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असुन तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे.  आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे.  महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकिक, अमोल तहकिक, चंद्रकांत खरात, भाऊसाहेब क्षीरसागर, जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  प्राध्यापिका संजीवनी नवल यांचे व्याख्यानाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकिक, मोनिका छाजेड, मनीषा कळसाई, मयुरी परदेशी, अस्मिता मराठे, पूजा मुळे, रेखा परदेशी, सुमनबाई कुलकर्णी, कांताबाई राठोड, रुख्मिणी कुलकर्णी आदींसह  महिलांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील Read More »

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

Clove Tea : दिवसाची सुरुवात असो किंवा कोणतंही शारीरिक, मानसिक काम केल्यानंतर आलेला थकवा असो एक कप कडकडीत चहा प्यायला की सगळी मरळ दूर होते आणि  मस्त तरतरी येते. त्यामुळे चहा हे अनेकांच्या आवडतं पेय आहे.  पूर्वी चहा हा अत्यंत साध्या पद्धतीने केला जात होता. मात्र, आता या चहामध्ये सुद्धा नवनवीन फ्लेवर मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे गृहिणी साधाच चहा हटके पद्धतीने तयार करत त्याला एक नवीन चव देतात. त्यामुळेच साध्या चहापेक्षा मसाला चहा, आल्याचा चहा, गवतीचहा, ब्लॅक टी, लेमन टी असे अनेक चहा लोकप्रिय होत आहे.  परंतु यासोबतच लवंगांचा चहा सुद्धा सध्या लोकप्रिय होत असून तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे लवंगांचा चहा कसा करायाच आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊयात. 1. श्रमाची काम केल्यामुळे किंवा आजारपणामुळे अंग दुखत असल्यास लवंगांच्या चहामुळे थकवा दूर होतो व आराम मिळतो. 2. अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दूर होतो व अन्नपचन व्यवस्थित होते. 3. दातदुखी दूर होते. 4. किरकोळ ताप येत असेल तर लवंगांचा चहा प्यावा. 5. सर्दी-खोकला दूर होतो. 6.डोकेदुखीपासून आराम मिळतो.  लवंगांचा चहा कसा कराल? 4-5 लवंगा घेऊन त्यांची बारीक पूड करा. त्यानंतर चहासाठी पाणी ठेवल्यावर त्यात 1 लहान चमचा तयार लवंगांची पूड टाका. लवंगांची पूड टाकलेलं पाणी 10 मिनीटं उकळवा व पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात चहा पावडर टाका. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. अशा प्रकारे लवंगांचा चहा तयार. ( आवड असल्यास साखर घालावी.)

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे Read More »

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिब वसमतनगर येथील ऐतिहासिक तलाव परिसरामध्ये अतिक्रमण वाढले असून त्यांच्याकडून ड्रेनेजचे पाणी तलावामध्ये सोडल्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने त्याचा बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापीलवार यांना केली आहे.   नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली चालणारा हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील गुरुद्वारा दमदमा साहिब येथील तलावाशेजारी मागील दहा ते बारा वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे.  अतिक्रमणधारकांनाकडून तलावामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडले जात असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दमदमा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. प्रदूषित तलावाच्या पाण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.         ऐतिहासिक तलावातील दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचा धोका निर्माण झाल्याने या परिसरातील अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवून तलावाला प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करून तलावाची पावित्र्य कायम ठेवावे अशी मागणी हजूरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजीतसिंघ बिशनसिंघ हजूरीपाठी, परदीपसिंघ जितसिंघ रागी, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ पैदल, हुकुमसिघ काराबिन यांनी हिंगोली जिल्हाधिकारी, वसमत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , सचखंड गुरद्वारा बोर्ड अधिक्षकांसह नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा Read More »

RBI Bank : सावधान, एकाच मोबाईल नंबरशी अनेक बँक खाती लिंक असेल तर आरबीआय करणार कारवाई

RBI Bank : आपल्या देशातील अनेक जणांचे आज एकापेक्षा जास्त बँक खाते आहे. जर तुमचे देखील एकापेक्षा जास्त बँक खाते असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे.  तुम्हाला हे माहिती असेलच की, जेव्हा तुम्ही बँक खाते उघडण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला KYC फॉर्म भरायला लावला जातो. ज्यामध्ये खाते पडताळणीशी संबंधित सर्व माहिती आणि ग्राहकांची माहिती असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एकापेक्षा जास्त खाती ठेवत असाल आणि त्यांना एकाच मोबाइल नंबरशी लिंक करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही प्रणाली बदलण्यासाठी आरबीआय बँकेला माहिती देऊ शकते. RBI बदल करू शकते बँकांमधील खात्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी, RBI बँकांच्या सहकार्याने KYC नियम कडक करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँका त्यांच्या ग्राहकांच्या पडताळणीसाठी अतिरिक्त स्तर लागू करू शकतात. नियम कोणाला लागू होणार? मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँकांवरील या नियमाचा परिणाम संयुक्त खाते आणि समान संख्या असलेल्या अनेक खातेधारकांवर अधिक होईल. यासाठी त्यांना केवायसी फॉर्ममध्ये दुसरा नंबर टाकावा लागेल. संयुक्त खात्याच्या बाबतीत ग्राहकांना पर्यायी नंबर देखील टाकावा लागेल. वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या नेतृत्वाखालील एक समिती संपूर्ण वित्तीय क्षेत्रात इंटरऑपरेबल KYC नियमांचे मानकीकरण आणि खात्री करण्यासाठी काम करत आहे. फिनटेक कंपन्यांकडून केवायसी नियम शिथिल करण्याबाबतच्या चिंता दूर करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना धोका वाढू शकतो. तुम्हाला कोणत्या कामात मदत मिळेल ते जाणून घ्या या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की ते संयुक्त खात्यांसाठी पॅन, आधार आणि मोबाइल नंबर यासारख्या बहु-स्तरीय दुय्यम ओळख पद्धतींचा देखील विचार करत आहेत.  दुय्यम मान्यता एखाद्या व्यक्तीच्या एकाधिक खात्यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देईल. जर ती लिंक नसेल आणि एकाधिक KYC कागदपत्रांसह उघडली गेली असेल. हे खाते एकत्रित करणाऱ्या किंवा संयुक्त खात्यापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. सध्या, वैयक्तिक अंतर्गत आर्थिक तपशील सामायिक करण्यासाठी एकल खातेधारकाचा समावेश करण्यात आला आहे.

RBI Bank : सावधान, एकाच मोबाईल नंबरशी अनेक बँक खाती लिंक असेल तर आरबीआय करणार कारवाई Read More »

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News: शेवगाव पोलीसांनी धडाकेबाज कारवाई शेवगाव शहरातुन दोन आरोपींकडुन चार धारदार तलवारी जप्त करुन त्यांना अटक केली आहे.   09 मार्च 2024 रोजी आपले पोस्टे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवुन अवैध धंद्यावर कारवाई, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत मोहीम राबवावी याबाबत  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेश प्राप्त झाले होते.   त्याअनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक  शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत 06.30 वा. चे सुमारास शेवगाव शहरात कोरडे वस्ती येथील दोन इसम यांनी स्वतः जवळ तलवार बाळगली असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून  विशाल संपत भाकरे (वय-२३ वर्षे रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) व संतोष अशोक घोंगडे (वय-२५ वर्ष रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेवुन सदर तलवारी बाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवडीचे उत्तरे दिली परंतु पोलीस पथकाने अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरच्या तलवारी ह्या घरामध्ये लपवून ठेवल्या आहेत. तुम्ही आमच्या सोबत चला त्या आम्ही काढून देतो.  तेव्हा आमचे कडिल पोलीस स्टाफ व पंचासमक्ष वरिल दोन्ही आरोपींनी त्यांचे ताब्यातील चार तलवारी काढुन दिल्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशन भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाने वरिल दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  राकेश ओला सो.अ.नगर,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अ.नगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी  सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोसई अमोल पवार, पोहेकॉ नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकों शाम गुंजाळ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों कृष्णा मोरे, पोकों संतोष वाघ, पोकों संपत खेडकर यांनी केली असून पुढील तपास पो.नि. दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ दराडे हे करत आहेत.

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई Read More »

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक

Ahmednagar News: ८ मार्च म्हणजे सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मात्र श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावातील एका अल्पवयीन म्हणजे नऊ वर्षाच्या मुली वरती दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला असून त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर मोबाईल मधील चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली.  मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला यावरून मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली.  या घटनेस चा सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत मात्र जागतिक महिलादिनी असा प्रकार घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक Read More »

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क

Health Tips: आहाराद्वारे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडे की पनीर? यापैकी कोणत्या पदार्थाद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात, जाणून घेऊया याबाबतची माहिती. पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अंडे व पनीर, दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जातात. शाकाहार करणाऱ्यांना पनीरपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं भरपूर आवडते. तर मांसाहार व डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारामध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे घटक आहेत. दरम्यान प्रोटीनमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय स्नायू मजबूत राहण्यासाठीही शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं आहे.  अंडे आणि पनीर, दोन्हींमध्येही भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे? दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो? दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास 100 ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा 14 ग्रॅम इतकी असते. तर 100 ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे. पनीर आणि अंड्याची तुलना अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते. हाडे बळकट होतात पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते. या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो. स्नायूंच्या निर्मितीसाठी अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात.  याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क Read More »