Dnamarathi.com

Kitchen Tips : आपल्याला चकचकीत स्वयंपाकघर आवडतं पण याला चकचकीत करण्यासाठी लागणारी मेहनत आणि एनर्जीचा वैताग येतो. 

त्यासाठी आम्ही आपल्याला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याला अवलंब करून आपण आपल्या स्वयंपाकघराला स्वच्छ आणि चकचकीत ठेवू शकता.

 स्वयंपाकघराची स्वच्छता करणं म्हणजे अक्षरशः थकवा येतो. आपण तासंतास आपला वेळ स्वयंपाकघरात घालवतात. दररोज स्वच्छ करून देखील बघा तेव्हा किचन घाण आणि पसरलेलंच असत. हे बघून फार चिडचिड होते.

 या लेखमध्ये आम्ही आपल्याला काही अश्या सोप्या टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपल्याला किचन स्वच्छ करणं सहज आणि सोपं वाटेल.

 किचनच्या टाइल्स 

उष्णता आणि स्वयंपाक केल्यामुळे टाइल्स चिकट आणि घाण होतात. हे स्वच्छ करणं म्हणजे मोठा प्रश्न असतो. टाइल्स लहान असो किंवा मोठे ते घाण होतातच. आता ह्यांना स्वच्छ करणं सोपं आहे.

काय करावं

 एका स्प्रेच्या बाटलीत 1 कप व्हिनेगर सह 1 ¼ कप बेकिंग सोडा मिसळा.

आता टाइल्सवर या लिक्विडचा स्प्रे करून टूथब्रशने घासून घ्या.

 घाण निघत नसल्यास या घोळात ½ कप लिक्विड साबण मिसळा

 आपल्या किचनच्या वेंटला नवे बनवा

आपल्या किचनच्या वेंट मध्ये सर्वात जास्त तेल जमा होतं. हे गॅस च्या वर असल्यामुळे उष्णतेमुळे तेल लवकर एकत्र करते.

काय करावं 

 एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पाणी तापत ठेवा आणि वेंट बाहेर काढा.

 हळू हळू या मध्ये ¼ कप बेकिंग सोडा मिसळा थोड्याच प्रमाणात मिसळा.

या मिश्रणाला 60 सेकंद पर्यंत उकळू द्या.

आपल्याकडे लहान भांड असल्यास त्याला पालटी करा आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक बाजू 60 सेकंदासाठीच घोळात असावी.

 चॉपिंग बोर्डाची स्वच्छता 

लाकडाचे बोर्ड कापण्यासाठी आणि चॉप करण्यासाठी चांगले असतात. पण त्यांचा पृष्ठभाग सच्छिद्र असल्यामुळे त्याचा वर त्वरितच डाग पडतात आणि त्यामधून वास येऊ लागतो.

काय करावं

बोर्ड वर मीठ भुरभुरा.

एक लिंबू घ्या त्याला अर्ध चिरून घ्या.

 आता या लिंबाने बोर्डाला मागून पुढून पुसून घ्या डाग आणि वास नाहीसे होतील.

जळालेले भांडे स्वच्छ करणं

आपण गॅसवर दूध ठेवून विसरून गेला आहात किंवा आपण साखरेला केरॅमल बनविण्याचा प्रयत्न केला असाल आणि साखर भांड्याला चिटकली असल्यास, परिणाम भांडंं जळतंं. तर काही उपाय करून आपण जळालेल्या भांड्यांना स्वच्छ करू शकता.

काय करावं 

 जळालेल्या भांड्यात 1 कप पाणी आणि 1 कप व्हिनेगर घाला.

या घोळाला उकळू द्या.

उकळल्यावर भांड सिंक मध्ये ठेवा आणि या मध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घाला.

 आता मिश्रण जमणे बंद झाल्यास कंटेनर रिकामे करा आणि कडक स्पॉंजने स्वच्छ करा.

जळालेले भांडे स्वच्छ झाले नसल्यास अतिरिक्त बेकिंग सोडा घाला.

 स्वयंपाकघरातील स्पॉंज स्वच्छ करावं

स्वयंपाकघर स्वच्छ करताना आपण स्पॉंज स्वच्छ करायला विसरतो, ज्यामुळे बॅक्टेरिया एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणून दिवसातून एकदा तरी ह्याची स्वच्छता करावी.

काय करावं 

 स्पॉंज मऊ करण्यासाठी आणि त्यामधून घाण आणि तेल काढण्यासाठी स्पॉंज एक ग्लास पाण्यासह काही मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.

 जळालेले गॅस बर्नर स्वच्छ करणे 

बऱ्याचदा जळालेले स्टोव्ह किंवा बर्नर गरम असल्यामुळे आपण स्वच्छ करतं नाही पण यासाठी सर्वात उत्तम उपाय अमोनिया आहे जे उत्तम ग्रीस रिमूव्हर आहे. म्हणून आपल्या गॅस बर्नरच्या सभोवताली ग्रीसचे डाग काढण्यासाठी याचा वापर करावा.

काय करावं

 एका झिपलॉक बॅगेत ¼ कप अमोनिया घाला. या पेक्षा जास्त टाकू नका.

या मध्ये आपल्या गॅस बर्नरला टाकून ठेवा आणि बॅग लॉक करा.

बर्नरला किमान 8 ते 9 तास असेच पडू द्या.

स्पॉन्जच्या मदतीने पुसून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *