DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई कारवाई करत संगमनेर शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास फिर्यादी उषा अशोक लोंगानी त्यांचे नातवाला घराकडे घेऊन जात असतांना पाठीमागुन बाईकवर दोन आरोपींनी येवुन त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले होते. त्यांनतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादविक 392, 34 प्रमाणे अनोळखी दोन आरोपी विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर दिनेश आहेर, स्था.गु.शा.अहमदनगर यांनी विशेष पथक नेमुण या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  या आदेशा प्रमाणे पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चापोकॉ/अरुण मोरे पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण  गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.  स्थागुशा पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील संशयीत आरोपीचे नांव सचिन ताके रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर असे असल्याचे निष्पन्न झाले.  पोनि दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या प्रकरणातील आरोपी त्याचा आणखी एक साथीदारासह अहमदनगर शहरातील चांदणी चौक परिसरात येत आहे.  यानंतर या बातमीनुसार  पोलीस पथकाने चांदनी चौक येथे सापळा लावला आणि एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.  

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Read More »

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते.  मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या आदी सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवल्याने तसेच काही नागरिकांनी गेवराई येथील अधिकाऱ्यांना संपर्क केल्याने गेवराई नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि आठ दिवसात दोन वेळेस गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाने एयरवाल बंद केले.  पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या चापडगाव येथील कांबी फाट्या जवळील एअरवॉलला अज्ञात इसमाने छेडछाड केल्याने गेल्या आठ दिवसापासून दिवसभरात किमान लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती.  सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले गेल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. परंतु गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने याविषयी सध्या नागरिकात मात्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.  या राज्य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद होत होती,  तर काही जण मोबाईलच्या स्टेटसला या पाण्याचे विहंगम दृश्य ठेवल्याने याची चर्चा होऊन काहींनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनास दूरध्वनीवरून संपर्क केल्याने पाईपलाईनच्या एअरवॉलमधून वाया जात असलेले पाणी हे तत्परतेने गेवराईचा नगरपरिषद पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केले. तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण-गेवराई या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनवर असणाऱ्या एअरवॉलला कोणत्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नये जेणेकरून पाण्याची नासाडी होऊन पाणी वायाला जाणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी तसेच आसपासच्या नागरिकांनी घ्यावी.  तसेच कोणी अशा प्रकारची छेडछाड करत असल्याचे नगरपरिषदेच्या फिरत्या पथकास निदर्शनास आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांच्या आदेशावरून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. – ए.बी. लाड  पाणीपुरवठा प्रमुख, गेवराई नगरपरिषद

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..! Read More »

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

Ahmednagar Police : ट्रान्सपोर्टची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या कॅबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले असून या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. अरुण सुखदेव लंके (रा.चिखली ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,’कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,’एक मालवाहतूक ट्रक (एम.डब्लू.ए ३९४९) या गाडीत बेकायदा विनापरवाना दारूची वाहतूक होत आहे’ ही माहिती प्राप्त होताच गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी कायनेटिक चौकात सापळा लावून ट्रक थांबवून पाहणी केली असता ट्रॅकच्या कॅबिनमध्ये सात देशी विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.त्याच्या ताब्यातील १० लाख ५२ हजार ८०० रु. किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये वाहतूक ट्रक व देशी-विदेशी दारूचा सामावेश आहे. पो. कॉ. कैलास शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अरुण सुखदेव लंके या ट्रक चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ.गणेश धोत्रे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींनी केली आहे.

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक

Ahmednagar News – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होत. सध्या ते राज्यभर दौरे करत असून जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव येथे सकल मराठा समाजाने एका कुत्र्याला छगन भुजबळांचे नाव देत बिस्कीट खाऊ घालत आंदोलन केलं. सध्या राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे व छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यामुळे राजकारण तापू लागले आहे. दरम्यान नेत्यांची भाषा खालावू लागल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होऊ लागला आहे. नुकतेच भुजबळ यांनी टीका करताना मेंदूने दिव्यांग, टाकीवर चढलेले गाढव एवढ्या वर कोणी नेले असे म्हणत जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली. यांच्या निषेधार्थ कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्क एका कुत्र्याला प्रतिकात्मक छगन भुजबळ याचे नाव देत त्याला बिस्किट खाऊ घालत भुजबळ यांची कान उघडणी करण्यात आली आहे. त्यांना या कुत्र्यप्रमाणे इमानदार राहण्याचा व शांत राहण्याचा सल्ला मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदर अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक Read More »

Kinetic Green : बाजारात आली ‘ही’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर! थेट Ola ला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत

Kinetic Green : बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ पाहता आणखी एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच झाली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि,  Kinetic Green या ऑटो कंपनीने ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.  Kinetic Zulu या नावाने ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. मुंबईत उपलब्ध असलेल्या FAME-2 सबसिडीनंतर कंपनीने त्याची किंमत 94,990 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.  झुलूला पावर देण्यासाठी, त्याला हब मोटर मिळते, जी आपण बहुतेक कमी किमतीच्या इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये पाहतो. हे 2.1kW पीक पॉवरसाठी रेट केले गेले आहे, 60kW चा दावा केलेला टॉप स्पीड देते. त्याची मोटर फक्त 93 किलो वजनाची हलकी स्कूटर चालवण्यासाठी डिझाइन केलेली आहे. 104 किमीची रेंज बॅटरी पॅक हा इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्वात महाग घटक आहे. त्यामुळे, येथे बॅटरी आश्चर्यकारक नाही, एक अगदी लहान 2.27kWh युनिट, जी 104 किमीची रेंज देते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. फीचर्स  यात टेलिस्कोपिक फोर्क, ट्विन शॉकअप , ड्युअल डिस्क ब्रेक आणि 10-इंच व्हील्स  आहेत. जर आपण त्याच्या फीचर्सबद्दल बोललो तर, त्यात एक एलसीडी युनिट आणि एक एलईडी डीआरएल आहे. बॅटरी  सबस्क्रिप्शन पॅकेज झुलू ईव्ही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर ऑनलाइन खरेदीसाठी देखील उपलब्ध आहे. हे बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेलसह देखील दिले जात आहे. यामध्ये, तुम्ही बॅटरी पॅकशिवाय स्कूटर सुमारे 69,000 रुपये किमतीत खरेदी करा आणि नंतर बॅटरी सबस्क्रिप्शन म्हणून प्रति महिना 800 रुपये द्या.

Kinetic Green : बाजारात आली ‘ही’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर! थेट Ola ला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत Read More »

Ranbir Kapoor : अर्रर्रर्र.. म्हणून डिलीट होणार Animal मधील ‘हे’ दोन सीन; जाणून घ्या नेमकं प्रकरण 

 Ranbir Kapoor : गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट  चर्चेत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत  बॉक्स ऑफिसवर  700 कोटींची कमाई केली आहे. रेकॉर्डब्रेक कमाई दरम्यान, चित्रपटाला अनेक गोष्टींमुळे प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच या चित्रपटावर शीख धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला असून शीख संघटनेने या चित्रपटाविरोधात निदर्शने करत काही दृश्यांवर आक्षेप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट विषारी आणि महिलाविरोधी असल्याचे म्हटले जात आहे. आता शीख समुदाय ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशनने चित्रपटातील अनेक दृश्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या संघटनेचे अध्यक्ष करनैल सिंह पीर मोहम्मद यांनी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रसिद्ध गाण्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. श्री गुरु गोविंद सिंग यांनी गायलेले हे लोकप्रिय गाणे ‘गुंडगिरी आणि टोळीयुद्ध’ दाखवण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.   याशिवाय ‘अ‍ॅनिमल’मधून शीख धर्मीयांशी संबंधित वादग्रस्त दृश्य हटवण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. एका दृश्यात ज्यावर आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे, त्यात चित्रपटाचा बिघडलेला नायक गुरसिखच्या तोंडावर सिगारेटचा धूर उडवताना दिसत आहे आणि दुसऱ्या दृश्यात तो गुरसिख तरुणाच्या दाढीवर चाकू ठेवताना दिसत आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या अति हिंसाचारावर अनेकांनी आपला आक्षेप व्यक्त केला आहे. या चित्रपटावर विषारी सवयींचा गौरव केल्याचा आरोप आहे.

Ranbir Kapoor : अर्रर्रर्र.. म्हणून डिलीट होणार Animal मधील ‘हे’ दोन सीन; जाणून घ्या नेमकं प्रकरण  Read More »

ICC Player Of The Month Award :  आयसीसीने मोहम्मद शमीला दिला धक्का! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय

 ICC Player Of The Month Award : विश्वचषका 2023 च्या अंतिम सामन्यात जबरदस्त  शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडचा आयसीसीने विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या विजेतेपदाचा हिरो ठरलेल्या हेडला नोव्हेंबरमधील चांगल्या कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवडण्यात आले आहे. या पुरस्काराने सन्मानित होणारा हेड हा दुसरा ऑस्ट्रेलियन पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा पुरस्कार डेव्हिड वॉर्नरला देण्यात आला होता. हेडला विश्वचषक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हेडने मॅक्सवेल-शमीला मागे टाकलेडावखुरा विध्वंसक फलंदाज हेडने मोहम्मद शमी आणि देशबांधव ग्लेन मॅक्सवेल यांना हरवून हा पुरस्कार जिंकला. आयसीसीने नोव्हेंबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शमी आणि मॅक्सवेलचेही नामांकन केले. शमीने विश्वचषकात खळबळ उडवून दिली. पहिल्या चार सामन्यांमध्ये बेंचवर असूनही तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. तर मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध अविस्मरणीय द्विशतक झळकावले होते. हेडने सहकारी खेळाडू आणि व्यवस्थापनाला श्रेय दिलेपुरस्कार मिळाल्यानंतर हेड म्हणाले, “गेले 12 महिने संघासाठी अतुलनीय होते, ज्याचा भाग बनणे खरोखरच एक विशेषाधिकार आहे. आम्ही ज्या प्रकारे देशांतर्गत उन्हाळी हंगामाचे व्यवस्थापन केले आहे, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विश्वचषक. याचे श्रेय पॅट, खेळाडू आणि कर्मचारी यांना जाते. मी भाग्यवान होतो की माझे हात तोडल्यानंतरही त्यांनी (संघ व्यवस्थापन) विश्वचषकासाठी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे जगणे माझ्यासाठी चांगले आहे. त्यांच्या भरवशावर संधी मिळाली. मला वाटले की मी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी विश्वचषकात केली आहे. कदाचित प्रत्येक स्पर्धेपूर्वी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे.” हेड पुढे म्हणाले, “या पुरस्काराने सन्मानित होणे ही एक मोठी सन्मानाची गोष्ट आहे, परंतु हा एक सांघिक प्रयत्न आहे. माझ्या तिन्ही फॉरमॅटमधील सहकाऱ्यांशिवाय हे शक्य झाले नसते.

ICC Player Of The Month Award :  आयसीसीने मोहम्मद शमीला दिला धक्का! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय Read More »

Mumbai News : तरुणासोबत लॉजवर आली होती महिला अन् सकाळी दरवाजा उघडताच घडलं असं काही.. 

 Mumbai News: कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या रूममध्ये  महिलेचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानक संकुलात असलेल्या तृप्ती लॉजच्या एका रूममध्ये 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपर येथील रहिवासी ज्योती तोडरमल असे महिलेचे नाव आहे. ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी कल्याण शहरातील एका लॉजमध्ये मृतदेह आढळून आला. अधिकाऱ्याने सांगितले की, हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना रूममध्ये महिला संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडलेली आढळली. तर मृत महिलेचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे. एमएफसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. शनिवारी दुपारी ज्योती या भूपेंद्र गिरी नावाच्या तरुणासोबत तृप्ती लॉजमध्ये आली होती. सकाळी बराच वेळ होऊनही रूमचा दरवाजा न उघडल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर ज्योती मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर तातडीने महात्मा फुले पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन  पोस्टमार्टमसाठी   पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीसोबत आलेला भूपेंद्र गिरी शनिवारी रात्री आठच्या सुमारास लॉजमधून बाहेर पडला होता. सामान घेण्यासाठी बाहेर जात असल्याचे त्यांनी लॉज मालकाला सांगितले. मात्र तो परतला नाही. सध्या फरार असलेल्या भूपेंद्र गिरीवर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटले असताना याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तृप्ती लॉजच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असल्याची माहिती आहे. सध्या ही हत्या का आणि केव्हा झाली याचा तपास पोलीस करत आहेत.

Mumbai News : तरुणासोबत लॉजवर आली होती महिला अन् सकाळी दरवाजा उघडताच घडलं असं काही..  Read More »

Sharad Pawar On Onion Farmer Protest : राज्यात पुन्हा कांद्यावरून संघर्ष; शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग केला बंद; शरद पवार म्हणाले … 

Sharad Pawar On Onion Farmer Protest : मोदी सरकारने काही दिवसापूर्वी मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान तापले आहे. आज कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील सहभागी झाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला करत कांदा निर्यातीवरील बंदी लवकरात लवकर उठवण्याची मागणी केली तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी दुपारी पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह नाशिकच्या चांदवड शहरातील कांदा उत्पादकांच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी हजारो स्थानिक शेतकरी उपस्थित होते. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला आहे. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे कांदा निर्यातीवर घातलेली बंदी तात्काळ हटवण्याची मागणी केली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावात केंद्राच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या कांदा उत्पादकांना संबोधित करताना पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची गरज आहे. ते म्हणाले, नाशिक सर्व शेतकऱ्यांना या दिशेने मार्ग दाखवू शकते. पवार म्हणाले, कांदा उत्पादक हे छोटे शेतकरी आहेत जे चांगले पीक घेण्यासाठी कष्ट करतात. ते म्हणाले की, ते केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी कधीही कांद्याचे भाव कमी केले नाहीत किंवा त्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी घातली नाही. कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकार कांदा खरेदी करेल- फडणवीसदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधान परिषदेत सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचा कांदा विकला गेला नाही किंवा ज्यांच्या बोली मिळालेल्या नाहीत, त्यांच्याकडून केंद्र कांदा खरेदी करण्यास तयार आहे. सोमवारी त्यांनी सांगितले की, कांदा निर्यातबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत. याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. केंद्र सरकारने अलीकडेच पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवून भाव नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. याविरोधात राज्याच्या काही भागात शेतकरी आंदोलन करत आहेत.

Sharad Pawar On Onion Farmer Protest : राज्यात पुन्हा कांद्यावरून संघर्ष; शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग केला बंद; शरद पवार म्हणाले …  Read More »

Maharashtra Dengue Case : राज्यात डेंग्यूचा उद्रेक! दर तासाला 2 जणांना लागण, ‘या’ भागात आढळले 4300 रुग्ण

Maharashtra Dengue Case : राज्यात डेंग्यूचा उद्रेक होताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होत असल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. डेंग्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक रुग्ण कुठे आहेत?आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 2 लाख 34 हजार 427 डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यापैकी महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 17 हजार 531 इतकी आहे. तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक 33 हजार 75 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे, जिथे एकूण 19 हजार 672 रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह राज्यभरातील लोकांच्या आरोग्यावर डासजन्य आजारांचा मोठा परिणाम झाला आहे. आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार संपूर्ण देशाची तुलना केल्यास महाराष्ट्रात सात टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईत 4 हजार 300 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य विभागाने काही सूचना जारी केल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 4 वर्षातील सर्वाधिक प्रकरणेआकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 3 हजार 356 होती, तर 2021 मध्ये राज्यातील रुग्णांची संख्या 12 हजार 720 झाली. सन 2022 मध्ये राज्यात 8 हजार 578 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते, तर यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्यात एकूण 17 हजार 541 लोकांना या गंभीर आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Maharashtra Dengue Case : राज्यात डेंग्यूचा उद्रेक! दर तासाला 2 जणांना लागण, ‘या’ भागात आढळले 4300 रुग्ण Read More »