Dnamarathi.com

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )

Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते. 

मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या आदी सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवल्याने तसेच काही नागरिकांनी गेवराई येथील अधिकाऱ्यांना संपर्क केल्याने गेवराई नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि आठ दिवसात दोन वेळेस गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाने एयरवाल बंद केले.

 पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या चापडगाव येथील कांबी फाट्या जवळील एअरवॉलला अज्ञात इसमाने छेडछाड केल्याने गेल्या आठ दिवसापासून दिवसभरात किमान लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती.

 सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले गेल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती.

परंतु गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने याविषयी सध्या नागरिकात मात्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. 

या राज्य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद होत होती,  तर काही जण मोबाईलच्या स्टेटसला या पाण्याचे विहंगम दृश्य ठेवल्याने याची चर्चा होऊन काहींनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनास दूरध्वनीवरून संपर्क केल्याने पाईपलाईनच्या एअरवॉलमधून वाया जात असलेले पाणी हे तत्परतेने गेवराईचा नगरपरिषद पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केले.

तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण-गेवराई या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनवर असणाऱ्या एअरवॉलला कोणत्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नये जेणेकरून पाण्याची नासाडी होऊन पाणी वायाला जाणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी तसेच आसपासच्या नागरिकांनी घ्यावी.

 तसेच कोणी अशा प्रकारची छेडछाड करत असल्याचे नगरपरिषदेच्या फिरत्या पथकास निदर्शनास आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांच्या आदेशावरून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. – ए.बी. लाड  पाणीपुरवठा प्रमुख, गेवराई नगरपरिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *