DNA मराठी

ताज्या बातम्या

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता

Sujay Vikhe Patil : अहमदनगर मध्ये रोजगाराची उपलब्धता वाढवण्याकरिता मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहती करिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्री मंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.  काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील 600 एकर म्हणजेच सुमारे 225 हेक्टर आर जमीन फेज 2 साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.  विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुजय विखेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता Read More »

MIDC Police: श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक, MIDC पोलीसांची कामगिरी

MIDC Police: MIDC पोलीसांनी मोठी कारवाई करत पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. MIDC पोलीसांनी दोन गुन्हे उघडकीस आणुन तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 03 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी श्रीकृष्ण बबन रायकर ( रा पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर) यांनी श्री. संत सावता महाराज मंदीरातील विठठल रुख्मीनीच्या डोक्यातील मुकुट व रुख्मीणीच्या गळयातील मणीमंगळ सुत्रातील सोण्याचे 4 मणी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा  तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा राहुल नानासाहेब शिंदे आणि कुणाल विजय बनसोडे यांनी केला आहे आणि ते  सध्या वडगाव गुप्ता येथे आहेत.  त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना वडगाव येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी वडगाव गुप्ता येथुन सदर आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.  सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडे एक नटराज देवताची मृती मिळुन आली. तसेच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल आहे. तसेच त्यांनी सदरची मृती कोटुन आणली याबाबत त्यांना काहीएक सांगता आले नाही. त्यामुळे त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे.

MIDC Police: श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक, MIDC पोलीसांची कामगिरी Read More »

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका

Navneet Rana : राज्याचे राजकारणात पुन्हा एकदा   अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा चर्चेत आले आहे.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी राणा दाम्पत्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आरोपी आहेत. त्याच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. राणा दाम्पत्याने दावा केला होता की एफआयआर नोंदवण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती, जी बेकायदेशीर होती. मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. या खटल्याची सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निकाल राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात आला. तसेच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याचिका फेटाळल्यानंतर आता न्यायालयातून खटल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रकरणी आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी 5 जानेवारीला होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई पोलिसांनी त्यांना तसे न करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांची नोटीस न जुमानता राणा दाम्पत्याने ठाकरे यांच्या विरोधात आंदोलनाचा गजर केला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी खार पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम 153अ, 34,37 आणि मुंबई पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  नंतर आयपीसीच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोहाच्या गुन्ह्यातही वाढ करण्यात आली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना सशर्त जामीन मिळाला.

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका Read More »

BJP News: मोठी बातमी! अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदी भानुदास बेरड यांची नियुक्ती

BJP News :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुक होणार आहे. यासाठी आत्तापासूनच भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. यानुसार भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री व आ.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महा विजय 2024 अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक म्हणून प्रदेश कार्यकारणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांची निवड केली आहे.  मागच्या 35 वर्षापासून भानुदास बेरड हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ निष्ठावंत म्हणून काम करीत आहेत.

BJP News: मोठी बातमी! अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदी भानुदास बेरड यांची नियुक्ती Read More »

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद

Ahmednagar News: बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी 2 लाख 38 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 22 मे 2023 रोजी फिर्यादी रुपेश रोहिदास गायकवाड तारकपुर बस स्टँड अहमदनगर येथुन आळेफाटा जाणेकरीता बस मध्ये चढत असतांना अज्ञात आरोपींनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन चोरुन नेली होती. या गुन्ह्याची नोंद कलम 379 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.  गुन्हाची नोंद झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्या पथकाने तारकपुर बस स्टँड येथे सापळा रचुन तीन संशयीत महिलानां तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपासकामी हजर केले असून या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर , अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद Read More »

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले!

Ahmednagar News: आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात.  काहीजणांना सोशल मीडियावर प्रेम देखील होतो मात्र त्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक बातम्या आपण वाचले आहेत.  अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली आहे. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुली सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगरमध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले.  सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वाच्या जगात हरवून जातात. मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास, बदनामी अटळ असते. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याचे समजले. तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे,रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. ‘याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.’ …मग आयुष्याचा जोडीदार निवडताना का काळजी घेत नाही?  ‘सर्व शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर यादव एक आवर्जून उदाहरण सांगतात की,’आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी’

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले! Read More »

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू

Ahmednagar Accident: राज्यात कालरात्री पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर – पुणे- कल्याण महामार्गावर डिंगोरे परिसरात तीन वाहनांच्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.  मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील अंजिराची बाग येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात माळशेज घाटाजवळील मढ गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.  अपघातग्रस्ताचे कुटुंब जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते व रात्री उशिरा घरी परतत होते. गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय 4), काव्या मस्करे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. तीन वाहनांची धडक… कुटुंब उद्ध्वस्त गणेश मस्करे हा भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा. त्यामुळेच तो पिकअपमध्ये भाजीपालाही भरून आणत होता. कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी जात होता.  पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मस्करे हे आळेफाटा येथून भाजीपाला घेऊन पिकअपने ओतूरहून कल्याणच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाने पिकअपला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. चालक आणि मस्करे कुटुंब पिकअपच्या केबिनमध्ये बसले होते आणि मागे एक कुली बसला होता.  रिक्षाला धडकल्यानंतर पिकअपची कल्याणकडून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे पिकअपमधील 5 पुरुष, 1 महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. कारवर टेम्पो उलटला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या कारवर टेम्पो उलटल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या कारवर भरधाव वेगात असलेला टेम्पो पलटी झाल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक महिला थोडक्यात बचावली. या अपघातात सुनील धारणकर (वय 65 वर्षे), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42 वर्षे) आणि अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा टेम्पो एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की टोयोटा इटिओस कारचा चक्काचूर झाला.  या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य सुरू केले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र या अपघातात अकोले तालुक्यातील एका दोन वर्षाच्या चिमुरडीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू Read More »

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता

IMD Weather News:  दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये देखील झपाट्याने वातावरण बदलताना दिसत आहे.  बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील बहुतेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अहमदनगर, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर भागात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे.   आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंड वाऱ्यांनी प्रवेश केल्याने पारा सामान्यापेक्षा खाली घसरला. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर 20 डिसेंबरनंतर किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून तापमानात आणखी 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. वास्तविक उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात पोहोचत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आता किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र नवीन हवामान प्रणालीमुळे पारा चढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काय म्हटले? IMD (पुणे) च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या म्हणण्यानुसार, 18 डिसेंबरपासून काही दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात किमान तापमानात चढ-उतार दिसून येतील, परंतु 18-20 डिसेंबरच्या सुमारास राज्यातील रात्रीचे तापमान सामान्यापेक्षा किंचित कमी राहील. यानंतर रात्रीच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ होऊ शकते. थंडी कमी होईल! IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. मात्र, या काळात राज्यातील उर्वरित भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते. 20 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यात उत्तरेकडील वारे वाहू लागतील, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक हे थंड वारे पश्चिम हिमालय आणि उत्तर-पश्चिम भारताच्या थंड प्रदेशातून येत आहेत. पाऊस का पडू शकतो? दुसरीकडे, हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही आठवडे अंतर्गत महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आणि विदर्भ आणि मराठवाड्यात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे. ओलसर आग्नेय-पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात आजपासून 20 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्येही गुलाबी थंडी कमी होणार आहे. या आर्द्रतेमुळे पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक सरी पडू शकतात. राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी कमी असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता Read More »

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ

Pune Women Murder: राज्याची संस्कृती राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार पुणे मधील बिबवेवाडी परिसरात महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नाकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   बिबवेवाडी परिसरातील एका मंदिराजवळ पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत महिलेचे बिबवेवाडी येथील गोयाला गार्डनसमोर एक दुकान होते, ज्यात आयुर्वेदिक औषधांची विक्री होत असे. 9 डिसेंबर रोजी ही महिला नेहमीप्रमाणे दुकानात झोपण्यासाठी आली. त्याचवेळी आरोपी दारूच्या नशेत तेथे पोहोचला आणि तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यावर आरोपीने घटनास्थळी उपस्थित असलेल्या रॉडने तिच्यावर अनेक वार केले. गंभीर जखमी महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांनी महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा सोडल्या. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक संशयास्पद दुचाकी दिसली. पोलिसांच्या पथकाने बिबवेवाडी ते चाकणपर्यंत 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. रविसिंग चितोडिया आणि विजय मारुती पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान दुचाकीवरून संशयित रविसिंगचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला नाशिक येथून अटक केली. चौकशीत त्याने विजय पाटीलचे नाव उघड केले. पोलिसांनी त्याला पालघर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ Read More »

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही……

Anna Hazare: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधान परिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला अखेर वर्षभरानंतर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतेमंडळींची चौकशी करणे शक्य होणार असून मुख्यमंत्री, मंत्री व आमदारही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी केले आहे. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच लोकायुक्त हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. तब्बल वर्षभरानंतर हे विधायक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला. या दरम्यानच्या काळात अनेक मोठी आंदोलने देखील अण्णांनी केली. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा आता विधानपरिषदेत देखील मंजूर झाला.  तसेच पुढे बोलताना अण्णा म्हणाले, आम्ही केलेल्या मागणीनुसार लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाला होता. हा मसुदा विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. विधान परिषदेत हे विधेयक आल्यानंतर यात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची चौकशी या माध्यमातून करता येणार आहे. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही. या कायद्याच्या आधारे आता मुख्यमंत्र्यांवर देखील कारवाई करणे शक्य होणार आहे असे यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले.

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही…… Read More »