DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले. या कारवाईत पोलिसांनी शिवप्रसाद कुमार (वय 20 वर्ष), कॅफे मॅनेजरला ताब्यात घेतला आहे. तसेच सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव, गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. तर दुसरीकडे सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/ सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129.131 (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय? Read More »

Maharashtra News : भविष्य निर्वाह निधीच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अद्यावत करण्याचे आवाहन

Maharashtra News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसारख्या सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या युनिफाइड पोर्टलचा वापर करून अद्ययावत करण्याचे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अहिल्यानगर कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना आणि कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना या योजनांद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ९९७ सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा कव्हर प्रदान करण्यात आले आहे. या योजनांचे नियंत्रण नाशिकच्या प्रादेशिक कार्यालयाद्वारे केले जाते. कर्मचारी ईएफपीओच्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन आपला युनिव्हर्सल अकाऊंट अद्ययावत करता येईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४१-२४११२७३ किंवा do.ahmednagar@epfindia.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra News : भविष्य निर्वाह निधीच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अद्यावत करण्याचे आवाहन Read More »

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर

EVM Scam : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबई सायबर पोलिसांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएम हॅक होऊ शकतात. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार खोटी आणि निराधार असल्याचे सांगून पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘शुजाने 2019 मध्येही असाच दावा केला होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येते. पार्श्वभूमी:– सय्यद शुजा हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएम हॅकिंगचे असंध्दावे करीत होता, ज्यामुळे दिल्लीत त्याविरुद्ध एफआयआर दाखल झाली होती. – यावेळी त्याच्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले होते की, ईव्हीएममधील मतदान डेटा बदलला जाऊ शकतो, परंतु निवडणूक आयोगाने (ECI) हे खंडन केले आहे. निवडणूक निकाल आणि विवाद:– **महायुती** (भाजप+शिवसेना-शिंदे+राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) यांना 288 पैकी **236 जागा** मिळाल्या आहेत. – **महाविकास आघाडी** (काँग्रेस+शिवसेना-उद्धव+राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) यांना **46 जागा** मिळाल्या आहेत. – विरोधी पक्षांच्या एका गटाकडून ईव्हीएममध्ये “घोळ” (मस्करी) होत असल्याचे आरोप केले जात आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया:ईव्हीएम हॅक करणे शक्य नसल्याचे ECI ने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मशीन्स वेगळ्या प्रणालीवर चालतात, त्यांना ब्ल्यूटूथ/इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते आणि प्रत्येक ईव्हीएमला VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) सोबत जोडले जाते, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते. निष्कर्ष:सध्या सायबर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. निवडणूक आयोग आणि सरकार यांनी ईव्हीएम प्रणालीवरील विश्वास राखण्यासाठी पुरावे सादर केले आहेत. तथापि, विरोधकांच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सतत चर्चा होत आहे.

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर Read More »

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Bollywood News: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न Read More »

Rahul Gandhi: गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान,महाराष्ट्राच्या पराभवावर CWC बैठकीत खर्गे संतापले

Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का देणाऱ्या काँग्रेसने सहा महिन्यांतर्गतच हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारल्याने पुन्हा एकदा काँग्रेसच्या संघटनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कमकुवत संघटना आणि गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचे विधान केले आहे. दोन दारुण पराभवांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. गटबाजीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही काँग्रेस अध्यक्षांना कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षातील दुफळीकडे बोट दाखवत खर्गे म्हणाले की, शिस्तीचा अभाव खपवून घेतला जाऊ शकत नाही. सध्याच्या काळातील आव्हाने ओळखून जुन्या पद्धतीचा अवलंब करून निवडणूक जिंकता येणार नाही, असे ते म्हणाले. हरियाणात पक्षाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वरिष्ठ नेत्यांची एकमेकांविरोधातील भाषणबाजी आणि गटबाजी. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यातून धडा घेतला नाही आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नाव न घेता खर्गे म्हणाले की, काही नेते सतत इतर नेत्यांविरोधात वक्तव्य करतात. पक्षांतर्गत अशा गटबाजीमुळेही नुकसान होते. कार्यकर्त्यांमध्ये शिस्त लागावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनीही आपली जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे.

Rahul Gandhi: गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान,महाराष्ट्राच्या पराभवावर CWC बैठकीत खर्गे संतापले Read More »

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण

Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी त्यांचे मूळगावी गेल्याने महायुतीमध्ये होणाऱ्या पुढील बैठका दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे जेव्हाही त्यांच्या गावी जातात तेव्हा मोठा निर्णय घेऊन परततात. संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे येत्या 24 तासांत काही मोठा राजकीय निर्णय घेऊन परतणार आहेत. यावेळी त्यांनी दावा केला की शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही पद घेणार नाहीत, कारण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. संजय शिरसाट म्हणाले, कोणतीही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि एकनाथ शिंदे यांना विचार करण्याची वेळ आली की ते दर्यागावला प्राधान्य देतात. तिथे गेल्यावर ना त्याचा मोबाईल चालतो ना कोणी त्याच्याशी संपर्क साधू शकतो. शांतपणे विचार करून मोठा निर्णय घेऊन ते परतात. शनिवारी सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय जाहीर करू शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला. दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतलीयाआधी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर महायुतीचे तिन्ही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. ही बैठक सकारात्मक असल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड केली जाईल, असे सांगितले होते.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra CM : मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार देवेंद्र फडणवीस?

Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. मात्र सरकार स्थापन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे राजकीय चर्चानुसार महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फार्मूला देखील ठरला आहे. या फॉर्मुलेनुसार भाजपला 20 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह गृहविभाग मिळावा यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप देखील गृह विभाग सोडण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ विभाग जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. जर शिवसेनेला गृह विभाग मिळाला नाही तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसल्याची चर्चा देखील होत आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या जागी खासदार श्रीकांत शिंदे किंवा गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra CM : मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार देवेंद्र फडणवीस? Read More »

Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? दिल्लीत तिढा सुटला नाही, आता मुंबईत होणार निर्णय

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पाडली मात्र या बैठकीमध्ये देखील महायुतीमध्ये एक मत न झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सरकार स्थापन करण्याबाबत पुढील चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव मुंबईतच ठरवले जाईल, याबाबत बैठक होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही अडथळा नाही- शिंदेदिल्लीतील बैठक आटोपून मुंबईत परतलेले एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट सकारात्मक होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबतची ही पहिलीच बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत आणखी एक बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होणार आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापनेत अडथळा बनणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करू, असे सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजपचा उमेदवार निवडण्याचा मार्ग मोकळा झाला. शिंदे म्हणाले, हा ‘लाडका भाऊ’ दिल्लीत आला आहे आणि ‘लाडका भाऊ’ या शब्दाचा अर्थ माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आहे. फडणवीसांचा मार्ग मोकळा, पण भाजप जातीय समीकरणे सांभाळेलएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणांचा विचार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे भाजपमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि मराठा समाजाच्या नेत्यांसाठी मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीमध्ये जातीय समीकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, कारण सर्व पक्षांच्या 288 आमदारांपैकी बहुतांश मराठा समाजाचे आहेत. फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे असून ते 2014 मध्ये प्रथम मुख्यमंत्री झाले आणि नंतर 2019 मध्ये काही काळासाठी मुख्यमंत्री झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाचे पालन केल्यास फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता बळावली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? दिल्लीत तिढा सुटला नाही, आता मुंबईत होणार निर्णय Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

NIA Raids in Human Trafficking Case : मानवी तस्करी प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे

NIA Raids in Human Trafficking Case: एनआयएने मोठी कारवाई करत मानवी तस्करी प्रकरणात देशभरात छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. एनआयएने विदेशी सहभागाच्या संशयावरून ही मोठी कारवाई केली आहे.हे छापे 6 राज्यांमध्ये सुरू असून अनेक देशांशी त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता. सायबर फसवणूक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही मोठी कारवाई केली आहे. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून बिहार गोपालगंज येथील तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून परदेशात गेल्यावर त्यांना बनावट कॉल सेंटरमध्ये बंधक बनवून सायबर फसवणूक करण्यात आली. या रॅकेटचा म्यानमार आणि लाओसशी संबंध असण्याची शक्यता आहे. यापूर्वी, 5 ऑक्टोबर रोजी एनआयएने दहशतवादी कट आणि दहशतवादी फंडिंगच्या संशयावरून 5 राज्यांतील 22 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. एनआयएने महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे छापे टाकले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणांबाबत ही कारवाई करण्यात आली. एनआयएने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि इतर भागातही छापे टाकले होते. बारामुल्ला येथील मौलवी इक्बाल भट यांच्या घराची एनआयएने सुरक्षा दलांच्या मदतीने झडती घेतली. 1 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी एनआयएच्या पथकाने दक्षिण 24 परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता येथे 11 ठिकाणी छापे टाकले होते.

NIA Raids in Human Trafficking Case : मानवी तस्करी प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे Read More »