DNA मराठी

ताज्या बातम्या

School

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा

Maharashtra News: अली पब्लिक स्कुल शाळेची कोणतीही मान्यता दर्शवणारे फलक लावण्यात आली नसल्याने कारवाई करण्यात यावी याबाबत गट शिक्षक अधिकारी पंचायत समितीकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. या अर्जात म्हटले आहे की, अली पब्लिक स्कुल, व्हिडिओकॉन कंपनीमागे, ग्रामपंचायत नागरदेवळे, बु-हाणनगर, अहमदनगर या ठिकाणी सदर शाळा ही तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुले-मुली शिक्षण घेत असुन त्या ठिकाणी शिक्षणासोबत मुलांकरीता हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही शाळा चालू असताना सदर शाळेने कोणतेही मान्यता असलेले फलक लावण्यात आले नसुन यामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते असे आमचे निदर्शनास आले आहे. सदरील गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असुन सदर विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये याकरीता आपण योग्य ती कारवाई करावी. याबाबत चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा Read More »

Hyundai Car Discount

Hyundai Car Discount : खर्चात होणार बचत, ‘या’ कार्सवर मिळतोय 70 हजारांचा डिस्काउंट

Hyundai Car Discount : तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात काही कार्सवर तब्बल 70 हजारांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये सर्वात भारी कार खरेदी करु शकतात. माहितीनुसार, सध्या ह्युंदाई त्यांच्या जुन्या मॉडेल्सवर मोठी सूट देत आहे. या ऑफर फक्त निवडक 2024 मॉडेल्सवरच वैध आहेत. यामध्ये Aura, i20, Grand i10 Nios आणि Exter यांचा समावेश आहे. Hyundai Exterह्युंदाईची एंट्री लेव्हल एसयूव्ही एक्सटर भारतीय बाजारपेठेत टाटा पंचशी स्पर्धा करते. हे मॉडेल गेल्या वर्षी बाजारात आले. सध्या या कारवर 40 हजारांची रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या कारमध्ये ग्रँड आय10 निओस आणि ऑरा सारखेच इंजिन आणि गिअरबॉक्स आहे. तुम्ही ही कार सीएनजी व्हर्जनमध्ये देखील खरेदी करू शकता. Hyundai Auraहोंडा अमेझ आणि मारुती डिझायरशी स्पर्धा करणाऱ्या ह्युंदाई ऑरावरही मोठी सवलत उपलब्ध आहे. या कारच्या 2024 मॉडेलवर 53000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याचे इंजिन आणि गिअरबॉक्स ग्रँड आय10 निओससारखेच आहेत. त्याचा सीएनजी प्रकार देखील बाजारात उपलब्ध आहे. Hyundai Aura i20ह्युंदाई आय20 ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक आहे. या कारवर 65,000 रुपयांपर्यंतची ऑफर उपलब्ध आहे. तथापि, स्पोर्टियर एन लाईन आवृत्तीवर कोणतीही सूट मिळत नाही. ह्युंदाई आय20 ही टाटा अल्ट्रोज आणि मारुती बलेनो सारख्या कारशी स्पर्धा करते. Hyundai Grand i10 Niosसवलतीच्या यादीतील चौथी कार म्हणजे Hyundai Grand i10 Nios, ज्याच्या 2024 मॉडेलवर 68,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही ऑफर सीएनजीसह सर्व प्रकारांवर लागू आहे. ही कार 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह येते.

Hyundai Car Discount : खर्चात होणार बचत, ‘या’ कार्सवर मिळतोय 70 हजारांचा डिस्काउंट Read More »

Warkari Educational

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू

Pune News : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी 3 सदस्यांचा सहभाग असलेल्या 20 समिती स्थापन केल्या असून दिनांक 6 आणि 7 फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या 20 समिती 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे. अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे. समिती स्थापन झाल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे.   सर्व 20 समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल.

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू Read More »

Bavankule

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (NA) परवानगी आवश्यक असणार नसल्याची घोषणा केली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जमीनधारकांना औद्योगिक वापरासाठी मानीव अकृषिक वापराची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एनए करण्यासाठी लागणाऱ्या वेळेएवढाच आहे, हे शासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जमिनीचा उद्योगासाठी वापर करावयाचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंतच्या कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही एनए परवानगी घेणे आवश्यक नाही. त्यासाठी या उद्योग घटकाने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी (Development permission) घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे (तलाठी) जावे. त्यानंतर त्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने लवकरात लवकर ती नोंद त्याच्या दप्तरात करावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. औद्योगिक जमिनीसाठी एनएची आवश्यकता असणार नाही. तसेच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही Read More »

IMG 20250204 WA0000

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त

Maharashtra News: नगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ड्रायव्हरकडून परस्पर टायरची विक्री करून फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक केली आहे. आरोपीकडून 19,94,650 ( 97 टायर) जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर 2024 रोजीकंटेनर क्रमांक पीबी-13-एडब्लू-5064 यावरील चालकाने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचा  सुपा पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 316 (4) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करण्यासाठी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी  पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश लोढे, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करुन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन तपास करणेबाबत आदेश दिले होते.   पथकाने यापुर्वी गुन्हयाचे तपासात दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी आरोपी 1) इरशाद निशार अहमद, (वय 55, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा, (वय 24, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यांना 2,52,000 रूपये किंमतीचे सीएट कंपनीचे 12 टायर अशा मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशनला हजर केले होते. दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पथक गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी नामे अन्सार, (रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश) हा मुंबई येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने पथकाने मुंबई येथे जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेऊन, दोन संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अन्सार अहमद (नयाबअली, वय 23, रा.सरायबीर भद्र, ता.सदर, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) जैद खान अजिम खान मोहमंद, (वय 27, रा.आझादनगर, घाटकोपर वेस्ट, मुंबई) असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाच्या विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा 3) जावेद खान, रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश (फरार) 4) शरिफ खान, रा.राणीगंज, उत्तरप्रदेश (फरार) 5) जोशेफ अली, रा.पिरथीगंज, उत्तरप्रदेश (फरार) अशांनी मिळून इरशाद निशार अहमद याचे मदतीने मिळून केला असल्याची माहिती सांगीतली. तसेच गुन्हयांतील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील टायर हे सुरत येथील शिवलाल शहा, रा.पाल, सुरत, गुजरात याचे मार्फतीने योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, आळाफाटा, पुणे यास विक्री केले असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शिवलाल शहा, रा.सुरत याचा राहते घरी जाऊन शोध घेतला तो मिळून आल्याने त्यास पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 6) शिवलाल हसमुखलाल शहा, वय 58, रा.ए 602, मरोधर रेसीडेन्सी,  पाल, सुरत, गुजरात असे असल्याचे सांगीतले.गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली. दिनांक 31/01/2025 रोजी पथक गुन्हयातील मुद्देमाल हा योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, पुणे याचेकडे असल्याने त्याचा गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना योगेश गुंजाळ हा त्याचे साथीदारासह बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 7) योगेश अरूण गुंजाळ, वय 36, रा.दत्तनगर, बेल्हे, ता.जुन्नर, जि.पुणे 8) वैभव भगवंता चौधरी, वय 31, रा.चौधरी मळा, जामगाव, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन 15,12,000/-रू किं.त्यात 72 सीएट कंपनीचे टायर, 80,000/- रू किं.त्यात 3 मोबाईल असा एकुण 15,92,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे योगेश अरूण गुंजाळ याचे उर्वरीत टायर बाबत विचारपूस करता त्याने सागर उर्फ महाराज शरद रूकारी यांना 10, दत्तात्रय शिवाजी सोमवंशी यांना 4, संकेत अशोक जाधव यांना 5 व राहुल संदीप औटी यांना 6 अशांना कंपनीकडून  टायर खरेदी केलेले असून टायरचे बील नंतर देतो असे खोटे सांगुन विक्री केल्याची पंचासमक्ष माहिती दिली.पथकाने पंचासमक्ष त्यांनी हजर केलेले 25 टायर किंमत रूपये 4,02,650/- असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील कारवाई सुपा पोलीस करत आहे.

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त Read More »

Rohit Pawar

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा

Rohit Pawar: दोन दिवसापूर्वी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहरात पार पडली. मात्र या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत सामन्यात आणि अंतिम सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराजमोहोळ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात राक्षे पराभूत झाले मात्र त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णय अमान्य केला. तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेवर आणि आयोजकांवर सोशल मीडियासह अनेक नेते मंडळी टीका करताना दिसत आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी देखील जोरदार टीका करत आयोजकांवर निशाणा साधला आहे. स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठीवादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. असं रोहीत पवार यांनी ट्विट करत आयोजकांवर टीका केली आहे.

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा Read More »

Devendra Fadanvis

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार

Maharashtra Government: महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातील सुधारित शासन आदेश जारी केला. त्यानुसार राज्य स्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पातळीवर पालकमंत्री सदस्य व जिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. आजच्या सुधारित जीआरमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद नसणार नाही. तर त्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नव जीआर काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाणार अनेक शासकीय विषयात समावेशअनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार असून, विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे. प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे. या पदावरील नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी असावे. प्रमाणपत्र देण्याचा अधिकारशासकीय योजनांसाठी ज्या काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारी यांना असेल तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल. सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना असेल. काय म्हणाले बावनकुळे?सुधारित निर्णय सरकारने केला असून, आता सरकारी सेवा व सुविधांसाठी लागणारी कागदपत्रे सुलभपणे मिळतील. जेणेकरून सरकार आपल्या दारी असल्याचे दिसून येईल. विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना महिला वर्गाला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच पुरस्कार विजेत्यांनाही या पदावर नेमले जाणार आहे. या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल. तसेच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केले जाईल.

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार Read More »

Jitendra Awhad

Jitendra Awhad : राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? ‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड भडकले

Jitendra Awhad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. या दाव्यानंतर नवा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकर यांच्या या दाव्यावर संताप व्यक्त करत हल्लबोल केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय.” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे. इतकेच नाही तर आव्हाडांनी छत्रपती शिवरायांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही केला आहे. आव्हाड यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे”. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल”, असा इशाराही आव्हाडांनी पोस्टमध्ये दिला आहे. दरम्यान राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर सोशल मीडियावर अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. चक्क लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती असेही ते म्हणाले. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले होते. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो. असं या मुलाखतीमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले.

Jitendra Awhad : राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? ‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड भडकले Read More »

Screenshot 2025 02 03 13 30 51 46 965bbf4d18d205f782c6b8409c5773a4

Maharashtra News: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर कारवाई करा, सकल मराठा समाजाची मागणी

Maharashtra News: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने पोलीस अधिक्षक नगर  यांना देण्यात आले आहे. या निवेदन म्हंटले आहे की, काल भगवानगडाचे बाचाळवीर महंत नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेअक्कल व जातीयदवादी असून त्यांनी केलेल्या वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोचून भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे आमच्या भावना तिव्र झाल्या आहेत त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केलेले आपले वक्तव्य मागे घ्यावे. जर त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचून अशा वाचाळवीर महंत नामदेव शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी  अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Maharashtra News: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर कारवाई करा, सकल मराठा समाजाची मागणी Read More »

UPI Rules Change

UPI मध्ये मोठा बदल…, जाणून घ्या नवीन नियम, नाहीतर होणार नाही पेमेंट

UPI Rules Change: देशात वाढत असणाऱ्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना देखील समोर येत आहे. या घटनांना थांबवण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवीन नवीन नियम लागू करत आहे. तर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आजपासून UPI ​​ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये विशेष अक्षरे वापरता येणार नाहीत. म्हणजेच तुम्ही UPI आयडीमध्ये *#@ सारखे अक्षरे वापरू शकणार नाही. जर एखाद्या अ‍ॅपने विशेष वर्ण असलेला ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केला तर तो पेमेंट सेंट्रल सर्व्हरद्वारे नाकारला जाईल. एनपीसीआयने हा निर्णय का घेतला?UPI ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट करण्याची प्रक्रिया मानक आणि सुरक्षित करण्यासाठी NPCI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे डिजिटल पेमेंट सिस्टमची सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढेल. आता व्यवहार आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक वर्ण (A-Z, 0-9) वापरले जाऊ शकतात. NPCI ने UPI व्यवहार आयडी प्रमाणित करण्यासाठी आधीच नियम जारी केले आहेत. मार्च 2023 मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, व्यवहार आयडीची कमाल लांबी 35 वर्णांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा प्रमाण वाढला डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा सतत वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, 2019 मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा 34% होता, जो आता 83% पर्यंत वाढला आहे. उर्वरित 17% मध्ये एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेले पेमेंट समाविष्ट आहे. नवीन NPCI नियम लागू झाल्यानंतर, UPI पेमेंट अॅप्सना या बदलाचे पालन करणे बंधनकारक असेल. जर एखाद्या अॅपने नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केला नाही, तर ते UPI व्यवहार करू शकणार नाही.

UPI मध्ये मोठा बदल…, जाणून घ्या नवीन नियम, नाहीतर होणार नाही पेमेंट Read More »