DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्का! एकनाथ शिंदेंना दिलासा, आमदारांच्या अपात्रतेवर मोठा निर्णय

Maharashtra Politics :  शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज निर्णय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला आहे.  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. शिवसेनेच्या एकाही सदस्याला काढून टाकण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही असे ते म्हणाले. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली होती, त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 39 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय सोपवला होता.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्का! एकनाथ शिंदेंना दिलासा, आमदारांच्या अपात्रतेवर मोठा निर्णय Read More »

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मागील महिन्यात कुणाल भंडारी यांची समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी निवड झालेली होती. त्यांच्या कामगिरीची दखल घेत आता कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मुंबई येथे बागेश्वर धामचे महंत श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री कुणाल भंडारी यांची बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी बढती केली आहे.  सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य आपण सर्वांना सोबत घेऊन अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा यावेळी प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांनी व्यक्त केली.

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड Read More »

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू

Hit And Run Law :  केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात आला होता. त्यामूळे केंद्र शासनाच्या वतीने तूर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता. मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज बुधवार 10 जानेवारी पासून पुन्हा ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन करत साखळी उपोषणाला  सुरू करण्यात आली आहे.  गोरेगाव तहसिल कार्यालयाच्या पुढे आज बुधवारी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेले हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन व साखळी उपोषण पुकारलेले आहे.  अपघात झाल्यावर वाहन चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायद्याची तरतूद करा ,हीट अँड रन कायदा रद्द करा, वाहन सुरक्षा कायदा त्वरित लागू करा, इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. आंदोलनाला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गोंधर्य गोंदिया जिल्हा संघटक रवी पटले, जिल्हा सचिव राजेश ठाकरे गोरेगाव तालुका जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विजय बळगे तालुका उपाध्यक्ष प्रीतीलाल बिसेन, तालुका सचिव भुमेश्वर गाते ,मयुर नदेश्वर, भारत डोंगरे, खेतराम खोब्रागडे, मुन्ना पटले,दिनेश डोहळे, अभिजीत मेश्राम, उमेश फुन्ने, विवेक शहारे, नितीन दमाहे आदी उपस्थित होते. या आंदोलनाला तालुक्यातील 500 वाहन चालकांनी समर्थन दिले आहे.

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू Read More »

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री?

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे. दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.  भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री? Read More »

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

Maharashtra Politics: उद्धव गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘त्या’ प्रकरणात याचिका दाखल

Maharashtra Politics: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करण्याची शक्यता आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र यापूर्वीच एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी तब्बल 40 मिनटे बैठक झाली होती. यावर आता शिवसेनेने (उद्धव गट) आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय होण्यापूर्वी सभापती राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीला आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. उद्धव गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यापूर्वी तीन दिवस आधी सभापतींनी त्यांची भेट घेणे “अत्यंत अयोग्य” आहे. मंगळवारी नार्वेकरांवर निशाणा साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, नार्वेकर यांनी रविवारी शिंदे यांची भेट घेतली. जे ‘जज मीटिंग टू क्रिमिनल’ सारखे आहे. “आम्ही त्यांच्याकडून (स्पीकर) कोणत्या न्यायाची अपेक्षा करू शकतो,” असं ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर 10 जानेवारीपर्यंत निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात, नार्वेकर यांच्या विनंतीवरून, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, उद्धव गट आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी एकमेकांच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली होती. सभापती राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत मॅरेथॉन सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान दोन्ही गटातील शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार युक्तिवाद केला.  सुमारे 500 पानांचे निकाल तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेचा कोणता आमदार अपात्र ठरणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.   जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली, परिणामी महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही एमव्हीएमध्ये समावेश होता. 30 जून 2022 रोजी भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटांनी एकमेकांच्या आमदारांवर पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करत सभापतींसमोर याचिका दाखल केल्या होत्या.  दरम्यान, निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्य-बाण’ निवडणूक चिन्ह दिले, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे निवडणूक चिन्ह म्हणून ज्वलंत मशाल असलेली शिवसेना (यूबीटी) असे नाव देण्यात आले.

Maharashtra Politics: उद्धव गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘त्या’ प्रकरणात याचिका दाखल Read More »

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार असल्याने आज शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये संघटनेकडून जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेकांनी सहभाग नोंदवला.  मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला जाणाऱ्यांसाठी श्रीरामपूर तालुक्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटने करून देण्यात आली आहे. याच बरोबर इतर तालुके देखील अनेक प्रकारे मदत करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची तयारी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.   या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार आहे. ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.  या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक Read More »

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार

Crime News : जुन्या उधारीच्या पैशांना घेऊन झालेल्या वादात तिघा बापलेकासह अन्य दोघांनी मिळून तरुणाला ठार केले. ही धक्कादायक घटना गोंदिया रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शनिवारी  रात्री 8 वाजता दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.  मृत तरुणाचे नाव मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे असे आहे. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा वापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.  काय आहे प्रकरण गोंदिया रामनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली की, तक्रारदार प्रवीण ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-3, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे शनिवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेज समोर सिगारेट पिण्याकरिता संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये गेले होते.  तेथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला असता संतोष मानकर याने प्रवीण मेश्राम, मनीष भालाधरे आणि राहुल बरेले यांच्यासोबतही भांडण व शिवीगाळ केली. तसेच मिरची पावडर मनीष भालाधरे यांच्या डोळ्यात फेकून संतोष मानकर, लकी ऊर्फ लोकेश, पवन संतोष जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांनी लोखंडी रॉड, कुन्हाड, कोयता इत्यादी घातक हत्यारांनी वार करून मनीष भालाधरे याला ठार केले. प्रवीण मेश्राम याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्ह दाखल केलाय. या प्रकरणात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमण्यात आले. यानंतर पथकांनी संतोष मानकर, लकी संतोष मानकर, पवन संतोष मानकर आणि विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले, तर जॉर्डन शेंडे हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.  आरोपीना अवघ्या काही तासांत पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात केले होते.

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार Read More »