Dnamarathi.com

Upcoming Smartphone: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जून महिन्यात भारतीय बाजारात दमदार फीचर्स आणि कमी किमतीमध्ये काही जबरदस्त फोन लॉन्च होणार आहे. यामध्ये OnePlus, Vivo, Motorola, Xiaomi इत्यादींचा समावेश आहे.  चला मग जाणून घेऊया जून महिन्यात कोणत्या कोणत्या नवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहे. 

OnePlus लॉन्च करणार 2 स्मार्टफोन  

जून महिन्यात OnePlus भारतीय बाजारपेठेमध्ये OnePlus Nord 4 आणि OnePlus Nord CE 4 Lite लॉन्च करणार आहे.

 रिपोर्टनुसार, वनप्लसचे दोन्ही डिव्हाइस जूनच्या मध्यात लॉन्च केले जातील. Nord 4 स्नॅपड्रॅगन 7 प्लस जनरेशन 3 चिपसेटसह सुसज्ज असेल. कंपनीचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Nord CE 4 Lite स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 1 सह सुसज्ज असेल.

Motorola देखील लॉन्च करणार 2 नवीन स्मार्टफोन  

Motorola देखील दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Motorola G85 जूनच्या मध्यात लॉन्च होऊ शकतो. रिपोर्टनुसार, हे स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 1 चिपसेटने सुसज्ज असेल. कंपनीचा प्रिमियम स्मार्टफोन Motorola Edge 50 Ultra देखील लॉन्च होणार आहे. हे ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 8s जनरेशन 3 ने सुसज्ज असेल. तसेच 125W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.  

Oppo लॉन्च करणार नवीन सिरीज  

Oppo Reno 12 सिरीज देखील जूनच्या मध्यात बाजारात येऊ शकते. यात दोन स्मार्टफोनचा समावेश असेल. डिव्हाइसशी संबंधित अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Vivo चा फोल्डेबल स्मार्टफोन 6 जून रोजी लॉन्च होणार  

6 जून रोजी, Vivo आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन “Vivo X Fold 3 Pro” लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हँडसेट अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांसह येऊ शकतो. हे स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल.

Xiaomi CIVI 4 Pro

 Xiaomi CIVI 4 Pro भारतात जूनच्या मध्यात लॉन्च केला जाऊ शकतो. हे उत्कृष्ट कॅमेरा आणि आकर्षक डिझाइनसह येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *