DNA मराठी

हायलाईट

oplus 16908288

Maharashtra Government : मोठी बातमी! राज्यात आयएएस बदल्यांची फेरबदल; पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Maharashtra Government: राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आयएएस अधिकाऱ्यांचा फेरबदल जाहीर केला आहे. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी तसेच महत्त्वाच्या विभागांना नवे नेतृत्व देण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध वजनदार पदांवर बदली करण्यात आली आहे. शासनाने जारी केलेले आदेश तत्काळ लागू झाले असून, आगामी काळात अनेक धोरणात्मक निर्णयांवर या फेरबदलाचा परिणाम दिसून येणार आहे. कोणत्या अधिकाऱ्यास कोणती नवी जबाबदारी? राहुल रंजन माहीवाल यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे येथे नियुक्ती झाली आहे. प्रकाश खापले, जे आयुक्त – मृदा व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते, त्यांची बदली करून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. मंजिरी मनोळकर , ज्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे या पदावर होत्या, त्यांची बदली करून त्यांना आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्रिगुण कुलकर्णी , उपमहानिदेशक – यशदा, पुणे, यांना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंजली रमेश , मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, हिंगोली, यांची बदली करत त्यांना आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे नेमण्यात आले आहे. या फेरबदलामुळे प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आपल्या नवीन पदांची सूत्रे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Maharashtra Government : मोठी बातमी! राज्यात आयएएस बदल्यांची फेरबदल; पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या Read More »

chhatrapati sambhaji nagar to ahilyanagar road

Devendra Fadnavis: छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रस्ता तातडीने दुरुस्त करा; देवेंद्र फडणविसांचे आदेश

Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह सामान्य नागरिक करत आहे. छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रस्त्याची हालत खूपच बेकार झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रस्ता तातडीने दुरुस्त करा असे आदेश दिल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर दरम्यान सद्यस्थितीत असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील 53.4 किलोमीटर अंतरातील चार पदरी जमिनीला समांतर (ॲट ग्रेड) व सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्ग) सहा पदरी रस्ता निर्मितीला मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच नवीन ग्रीनफिल्ड रस्ता छत्रपती संभाजीनगर – जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी रस्ता जोडणी या नवीन आखणीस तत्वतः मान्यता देण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करावे. रस्ता विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावा. या रस्त्याच्या निर्मितीमध्ये कुठही दिरंगाई होऊ नये. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर दरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने वाहनांची अत्यंत वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचे काम विनाविलंब सुरू करावे. पुणे ते शिरूर महामार्गावर 35 किलोमीटर उन्नत महामार्गापैकी 7.40 किलोमीटर लांबीमध्ये जमिनीला समांतर रस्ता, त्यावर रस्ता व वरती मेट्रो अशा व्हाया डक्टची निर्मिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ यांनी समन्वयाने करावी. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा (करमाड) ते बिडकीन या 32.8 किलोमीटर लांबी, बिडकीन ते ढोरेगाव या 26 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्ता निर्मितीच्या कामासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन तातडीने सुरू करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

Devendra Fadnavis: छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रस्ता तातडीने दुरुस्त करा; देवेंद्र फडणविसांचे आदेश Read More »

vijay kumbhar

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले

Vijay Kumbhar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात त्यांचा नाव आल्याने पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधक करत आहे. तर आता मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. विजय कुंभार म्हणाले की, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे. घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे. – जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI – करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट – रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला आणि तरीही ते “निर्दोष”! ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे. कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं असं विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले Read More »

eknath shinde

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भाजपवर नाराज

Maharashtra Politics: राज्यात साध्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने मोठ्या प्रमाणात एका पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेला कल्याण डोंबिवलीमधील अनेक लोकांना भाजपने पक्षात घेतल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू झाली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या एकही मंत्रीने हजेरी न लावण्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, प्री कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आणि भाजपा युतीचा धर्म पाळत नसल्याची सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर केली. त्यामुळे भाजपच्या या घटनेचा निषेध म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भाजपवर नाराज Read More »

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला

Ambernath Crime: अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार-कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटरसायकलसुद्धा फोडून टाकली. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे.या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे. शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे.

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला Read More »

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ई-केवायसी

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता 31 डिसेंबर 205 पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ई-केवायसी Read More »

crime

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

Dhule Crime : आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार Read More »

hospital

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना; जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारची महत्वाची योजना आयुष्मान भारत योजना अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकांसाठी वरदान ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र ठरले असून 18 लाख 23 हजार कार्डे तयार आहे. योजनांचे मुख्य फायदे प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार 1,356 शस्त्रक्रिया व उपचार मोफत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत वय वंदना कार्ड अतिरिक्त 5 लाख रुपये कव्हर जिल्ह्यात अंमलबजावणी होत असलेल्या योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दोन्हींचा एकत्रित लाभ नागरिकांना उपलब्ध आयुष्मान गोल्डन कार्ड कसे मिळेल? स्व: लाभार्थी आशा स्वयंसेविका आपले सरकार सेवा केंद्र स्वस्त धान्य (राशन) दुकान आयुष्मान App (Google Play Store) कार्ड घरबसल्या तयार करा भेट द्या: beneficiary.nha.gov.in किंवा Google Play Store → Ayushman App डाउनलोड आधार क्रमांक/रेशन कार्ड/नोंदणीकृत मोबाईल वरून OTP नोंदणी कुटुंबातील सदस्यांची माहिती + फोटो अपलोड कार्ड डाउनलोड करा आणि वापर सुरू करा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना; जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र Read More »

fb img 1763353276214

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण

Ahilyanagar News: चार वर्षे चालत आलेल्या शेतरस्त्याच्या वादाला शेवटी तोडगा निघाला. महसूल विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांच्या समन्वयातून समुपदेशनाच्या माध्यमातून मार्ग काढत रस्ता खुला करण्यात आला. तहसीलदारांच्या आदेशाची प्रक्रिया सुरू असतानाच मंडळाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने फेरपालटाने जमिनींची अचूक माहिती समोर आली, त्यातून वादी–प्रतिवादींमध्ये सामंजस्य घडून आले. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने झाडी-झुडपे हटवण्याचा निर्णय घेतला आणि फक्त चार तासांत रस्ता खुला झाला. महसूल अधिकाऱ्यांनीही या सकारात्मक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. एकजुटीने काम केल्यास कोणतेही आव्हान सोपे होते, याचे उत्तम उदाहरण. चर्चेत सहभागी असणारे भाऊसाहेब मतकर, विक्रम मतकर, नारायण मतकर, सुरेश मतकर, राजेश मतकर, वसंत मतकर, रेवजी कराळे, कमलाकर जाधव, संदीप जाधव, म्हातारदेव जाधव, आदिनाथ जाधव, हरिश्चंद्र मतकर, रमेश मतकर, जैनोद्दीन शेख, मन्सूर शेख, पोपटराव कराळे (संचालक, खरेदी-विक्री संघ) आदी

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण Read More »

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane on Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत एनडीएने 243 पैकी 202 जागा जिंकल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राहुल गांधी यांचा पार्ट टाइम राजकारणी म्हणून उल्लेख केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत. अशांना भारतीय म्हणायचं का? हा प्रश्न आहे. बिहारच्या जनतेने अशा लोकांना स्पष्ट नाकारलं आहे. लोकशाहीची थट्टा करणं ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून NDA ला संधी दिली असं माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली होती. पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. विविध योजना आणल्या आणि त्याचं प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसलं असं देखील नितेश राणे म्हणाले.   तर दुसरीकडे हिंमत असेल तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात Read More »