DNA मराठी

क्राईम

Gangster Sharad Mohol : गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ ठार, जाणून घ्या कोण होता पुण्याचा गुन्हेगार?

Gangster Sharad Mohol: पुणे शहरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली आहे.  शुक्रवारी दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली.  या हल्ल्यात शरद मोहोळ गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरदिवसा झालेल्या गोळीबाराने शहरात खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ यांना राजकारणात येण्याची इच्छा   शरद मोहोळवर गुंड सिद्दीकीच्या हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. उपचारादरम्यान शरद मोहोळ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ससून हॉस्पिटलबाहेर चार-पाचशे लोकांचा जमाव जमला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शरद मोहोळ हे कोथरूड येथील सुतारदरा परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी मोहोळला लागली. गोळीबार करून आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी मोहोळला उपचारासाठी कोथरूड परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुंडाचा मृत्यू झाला. पुणे पोलिसांची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोण होता शरद मोहोळ? शरद मोहोळ हा पुण्याचा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक मोठे गुन्हे दाखल आहेत. पिंटूच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या खुनी सिद्दिकीची येरवडा कारागृहातच शरद मोहोळने हत्या केली होती. मात्र, पुराव्याअभावी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. जुलै 2022 मध्ये त्यांना सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

Gangster Sharad Mohol : गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ ठार, जाणून घ्या कोण होता पुण्याचा गुन्हेगार? Read More »

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त

Ahmednagar News: 28 डिसेंबर 2023 रोजी कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा ऋषिकेश देविदार लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता.  त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथील संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने केली आहे. या माहितीवरून त्यांनी  पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी,  अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड,  विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.  त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर रुपये 96,000 किमतीची जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000 रुपये किमतीची टाटा इंट्रा व्ही व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000 रुपये कि.चे असा एकुण 9,26,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.  स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत. 

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त Read More »

Ahmednagar News : बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एम.आय.डी.सी. परिसरामध्ये बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी  तब्बल 16,18,900 रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद केला आहे.  फिर्यादी सुजय सुनिल गांधी 30 डिसेंबर रोजी  लग्न समारंभाचे कार्यक्रमाकरिता गेले असता रात्री 11 च्या सुमारास परत घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बंद घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन 2,50,000 रुपये रोख रक्कम व 4,80,000 रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 3000 रुपये किमतीची लोखंडी तिजोरी असा एकुण 7,33,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला.  सदर घटनेबाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात  भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबाबत तपास करत असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, फिर्यादीचा मेव्हणा सुरज प्रकाश लोढा याने मुथुट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या आहे.  प्राप्त माहितीवरून पोलीस पथक सुरज लोढा याची माहिती घेत असतांना त्याच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने पोलीस पथकाने 03 जानेवारी रोजी सुरज प्रकाश लोढा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत  बारकाईने विचारपुस केली.  या तपासा दरम्यान आरोपीने  गुन्हा केल्याची कबुली दिली.   ताब्यात घेण्यात आलेला आरोपीकडून  त्याने चोरी केलेले 13,26,400 रुपये किमतीचे 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2,04,500 रुपये रोख रक्कम, तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेले 16,000 रुपये किमतीचे दोन मोबाईल, 70,000 रुपये किमतीची मोटारसायकल, 2000 रुपये किमतीचे तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ग्राइंडर असा एकुण 16,18,900 रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त केला आहे.  तसेच त्याने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 04 सोन्याच्या बांगड्या मुथुट फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवले असल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Ahmednagar News : बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Mumbai News : लाजिरवाणी घटना! 13 वर्षांच्या चुलत बहिणीवर भावांनी केला अत्याचार अन्…..

Mumbai News: राज्याची राजधानी मुंबईमध्ये नात्याला लाजवेल घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईत दोन भावांनी त्यांच्या 13 वर्षांच्या चुलत बहिणीवर अनेकदा बलात्कार केला. अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने दोघांचे हे घृणास्पद कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.  गेल्या आठ महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडिता घरी एकटी असताना चुलत भाऊ तिच्यावर बलात्कार करायचे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 22 वर्षीय आणि 18 वर्षीय भावांना अटक केली आहे. आईला संशय आला पीडित मुलगी मुंबईतील विक्रोळी परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहते. जिथे दोन्ही आरोपी त्यांच्या अल्पवयीन चुलत भावाला भेटायला येत असत. दोघेही अनेकदा घरी यायचे. यावेळी ते त्याच्या चुलत बहिणीलाही भेटत असेल. तथापि, सर्वांचे एकमेकांशी चांगले संबंध होते आणि ते भाऊ असल्यामुळे कोणालाच चुकीची भीती वाटत नव्हती. जेव्हा पीडितेचे आई-वडील दोघेही कामावर जात होते. तेव्हा  आरोपी आरोपी निष्पाप बालकावर घाणेरडे कृत्य करायचे. दाम्पत्याच्या अनुपस्थितीत अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला.  गेल्या रविवारी पीडितेच्या आईच्या लक्षात आले की, आपल्या मुलीचे पोट बाहेर आले आहे. त्यांनी त्या मुलीला याबाबत विचारले, पण तिने नीट काहीही सांगितले नाही. गर्भधारणेचे रहस्य उघड आपल्या मुलीच्या प्रकृतीबद्दल चिंतित असलेल्या आईने तिला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की मुलगी 23 आठवड्यांची गर्भवती आहे. हे ऐकून आई स्तब्ध झाली. त्यानंतर विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून तपास सुरू केला. तपासात मोठा खुलासा पीडितेने पोलिसांना सांगितले की, मे महिन्यात तिच्या लहान चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ऑगस्टमध्ये मोठ्या चुलत भावाने बलात्कार करण्यास सुरुवात केली. दोन्ही भावांनी तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. आरोपी आधी तिला अश्लील व्हिडिओ दाखवायचा आणि नंतर तिच्यावर बलात्कार करायचा. अल्पवयीन पीडितेच्या जबानीच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये बलात्कार, सामूहिक बलात्कार, वारंवार लैंगिक अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवणे आणि इतर गुन्ह्य़ांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News : लाजिरवाणी घटना! 13 वर्षांच्या चुलत बहिणीवर भावांनी केला अत्याचार अन्….. Read More »

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव! ‘या’ दिवशी लागणार बोली

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत होते.  मात्र आता त्याच्या आईच्या महाराष्ट्रातील चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार असल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारही मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके येथे आहे. मुंबके येथे असणाऱ्या शेतजमिनीचा लिलाव होणार आहे. ही जमीन दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहे. शुक्रवारी त्यांचा लिलाव होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील मुंबके येथे असलेल्या डॉन दाऊद इब्राहिमच्या आईच्या 20 गुंठेहून अधिक शेतजमिनीचा लिलाव होणार आहे. अधिकाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांत कुख्यात गुंड दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या सुमारे 11 मालमत्तांचा लिलाव केला आहे. चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये आहे. दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत 8 लाख 8 हजार 770 रुपये आहे. 21 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईतील जमिनींच्या लिलावाबाबत लिलावाची नोटीस जारी करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमचे मूळ गाव खेड तालुक्यातील मुंबके आहे. मुंबके गावात दाऊदचा बंगला आणि आंब्याची बाग होती. तर लोटे, खेड शहर अशा सहा ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या. तीन वर्षांपूर्वीही दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव झाला होता. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथे दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. 2020 मध्ये दाऊदच्या 1.10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. दोन फ्लॅट आणि बंद पेट्रोल पंप विकले. दाऊद सर्वात श्रीमंत डॉन दाऊद पाकिस्तानात राहतो आणि तेथून त्याचा काळा धंदा चालवतो. डॉनचा अवैध धंदा अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. याच काळ्या धंद्याच्या जोरावर दाऊद जगातील सर्वात श्रीमंत गुंड बनला आहे. 2015 मध्ये फोर्ब्स मासिकाने दिलेल्या अहवालानुसार दाऊदची संपत्ती सुमारे 6.7 अब्ज डॉलर्स आहे. मृत्यूची अफवा   काही दिवसांपूर्वी दाऊदला विषबाधा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. कधी दाऊदच्या घराबद्दल तर कधी दाऊदच्या तब्येतीबद्दल अनेक वेळा अफवा पसरल्या आहेत. 2020 मध्ये दाऊदचा कोरोनामुळे कराचीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आली होती.  त्यानंतर 2017 मध्ये दाऊदचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची अफवा पसरली होती. 2016 मध्ये दाऊद इब्राहिमचा गँगरीनमुळे मृत्यू झाल्याची बातमी आली होती.  दाऊदचा एड्समुळे मृत्यू झाल्याची बरीच चर्चा झाली होती. मुंबईत राहणाऱ्या दाऊदच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, फरारी दहशतवाद्याची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब आहे.

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव! ‘या’ दिवशी लागणार बोली Read More »

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 07 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.  फिर्यादी ऋषिकेश देविदास लगड यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तुर 27 डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास करताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी याने व त्याचे साथीदाराने केला असून आता ते हा शेतमाल विक्रीकरीता पारनेर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने जामगांव ते पारनेर जाणारे रोडवर जामगांव घाट या ठिकाणी सापळा रचुनवैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश अजिनाथ गोलवड, किरण संजय बर्डे आणि साहील नामदेव माळी या आरोपींना अटक केली आहे.   पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या कब्जामधून 96,000 रुपये किमतीची 12 क्विंटल पांढरी तुर, 30,000 रुपये किमतीची 6 क्विंटल सोयाबीन व 8,00,000 रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकुण 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.   ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणेमध्ये  भादवि कलम 379, 342 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे.  अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे  की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे.  अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळत चालली आहे. त्यामुळे बोधेगाव परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम अवैध जुगार व्यवसाय चालवणाऱ्याकडून या भागात सुरू असून सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी  तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू अशी मागणी बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले लेखी निवेदनद्वारे केली आहे.

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे.  या माहितीवरून संयुक्त कारवाई करण्याकरिता संदीप मिटके यांनी कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून माहिती दिली.   त्यांनी तहसील कार्यालय  येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.  तसेच मनोज चंद्रकांत गिरमे (वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव) अल्ताफ बाबू शेख ( वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.  आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बोधेगांव व खाटीक गल्ली शेवगांव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना 90,200 रुपये किमतीचे मुद्देमालासह अटक केली आहे. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.  या आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव,उमाकांत गावडे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले. नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार हे शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना खाटीक गल्ली, शेवगांव व बोधेगांव, ता. शेवगांव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत करत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दिनांक 28/12/2023 व दिनांक 29/12/2023 रोजी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी

Ahmednagar News :  मुकुंदनगर परिसरात मौलाना असलम शेख यांना 27 डिसेंबर रोजी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात परिसरातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये निवेदनाद्वारे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणात आरोपी असणाऱ्या अनिस सय्यदने मौलाना असलम शेख यांना गॅस कनेक्शनच्या वादातून जबरी मारहाण केली. या मारहाणीत मौलाना असलम शेख यांच्या उजव्या डोळ्याला मार लागला आहे.  या घटनेनंतर आरोपी विरोधात भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी आरोपी विरोधात आणखी कलम वाढवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी Read More »