Dnamarathi.com

Maharashtra News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर  माजी आमदाराच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

 पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 32 वर्षीय पीडितेसोबत आरोपीने लग्नाचा आमिष दाखवून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने तिच्या डोक्यात पिस्तुल रोखून धमकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यात 35 वर्षीय व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय अभिनेत्रीने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  

32 वर्षीय पीडितेने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ही घटना 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376 (2) (एन), 377, 323, 504 आणि 506 तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची आरोपीशी ओळख झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करणार असल्याचे अभिनेत्रीला सांगितले होते. लग्नाचे बोलून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

तक्रारदार महिलेने सांगितले की, जेव्हाही ती लग्नाबद्दल बोलायची तेव्हा आरोपी हे प्रकरण टाळायचा. नंतर तो महिलेपासून अंतर राखू लागला. दरम्यान, तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने तिला पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांकडे न जाण्याचा इशारा दिला.

पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीने मे 2023 मध्ये सोशल मीडियावर आरोपीसोबत चॅटिंग सुरू केले. घटस्फोटाची याचिका प्रलंबित असतानाही आरोपीने तिला लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने सांगितले की, तिचा 2016 मध्ये घटस्फोट झाला असून तिला एक मुलगीही आहे. अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, तिने सुरुवातीला आरोपीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, मात्र तो गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी पुण्यात आला होता. यावेळी आरोपीला भेटल्यानंतर त्याने आपला विचार बदलला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *