DNA मराठी

क्राईम

Crime 1

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ

Akola News : अकोल्या जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नितीन सुधाकर आखरे वय 35 वर्ष रा. बटवाडी बु  हे नेहमी प्रमाणे रात्री घराच्या अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्ञानी हला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  सोमवार दि.1 एप्रिल रोजी राञीच्या सुमारास उघडकीस आली. या बाबतचे फिर्याद  बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह  शवविच्छेदन तपासण्यासाठी रुग्णालय पाठविला.  या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जागेच्या वादावरून खुन झाल्याची चर्चा सुरु असून नेमका खुन कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्या नंतर समोर येईल हे निश्चित.  या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज जी, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ Read More »

Money

Nandura Urban Bank : बाबो… राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत मोठा घोटाळा; आरोपी अधिकाऱ्याला अटक

Nandura Urban Bank : राज्यातील सहकारी बँकेत पुन्हा एकदा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे.  या प्रकरणात पोलिसांनी एका अधिकाऱ्याला अटक देखील केली आहे.  नांदुरा अर्बन बँकेत एका अधिकाऱ्याने बँकेची 5 कोटी 45 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीसांनी तत्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गजानन शर्मा असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. शर्मा याने बँकेतील    इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली. शर्मा याने बँकेतून मोठ्या प्रमाणात रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा अर्बन बँक ही बुलढाणा जिल्ह्यातील नावाजलेली सहकारी बँक आहे. या बँकेत कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आरोपी गजानन शर्मा याने बँकेत मोठा गंडा घातला. शर्मा यांनी बँकेचे कोट्यवधी रुपये दुसऱ्या बँकेच्या खात्यात वारंवार ट्रान्सफर केले. बँकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे. बँकेच्या संचालकांना हा प्रकार कळताच त्यांनी त्यांच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी शर्माला अटक केली. आतापर्यंतच्या तपासात 5 कोटी 45 ​​लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. दुसरीकडे ही घटना वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर ठेवीदारांना आपले पैसे गमावण्याची भीती वाटू लागली. बँकेत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बँक व्यवस्थापनाने ठेवीदारांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे.

Nandura Urban Bank : बाबो… राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत मोठा घोटाळा; आरोपी अधिकाऱ्याला अटक Read More »

Mumbai 1

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू….

Mumbai News : मुंबईतील माहीम चौपाटी समुद्रकिनारी  होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी होळी साजरी केल्यानंतर पाच मित्र समुद्रात आंघोळीसाठी गेले होते मात्र भरती-ओहोटीमुळे ते बुडाले. मात्र, चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकाने चार तरुणांना वाचवून हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. काल संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या पाचव्या तरुणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, रात्री अंधार आणि भरती-ओहोटीमुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी तरुणाचा मृतदेह सापडला. सोमवारी 20 ते 21 वर्षे वयोगटातील पाच मुले माहीम समुद्रकिनारी होळी साजरी करण्यासाठी गेली होती. होळी खेळल्यानंतर ते माहीम ते शिवाजी पार्क किनाऱ्यादरम्यानच्या समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात भरती-ओहोटी होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.  काही खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले, हे पाहून बाकीचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र पाचही जण समुद्रात बुडू लागले. त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. तर एका तरुणाबाबत काहीही सापडले नाही. बचावलेल्या चार तरुणांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारपैकी दोघांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. एकावर उपचार सुरू आहेत. तर हर्ष किंजळे (19) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून माहीम येथे राहतात.

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू…. Read More »

IMG 20240323 WA0008

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका

Shrirampur News : श्रीरामपूर शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत कत्तली करीता बाधुन ठेवलेल्या 7 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून तब्बल 4 लाख 50 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2024 रोजी पोनि, नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की, वार्ड क्र 2 मध्ये पाण्याच्या टाकीजवळ श्रीरामपूर येथे गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्यासाठी आणली आहे. या माहितीवरून नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी तात्काळ तपास पथकास पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांना गोवंशीय जातीचे जनावरे मिळून आले.   या प्रकरणात तपास करत पोलिसांनी शहारुख हसन कुरेशी विरोधात  श्रीरामपूर शहर पो.स्टे. मध्ये  महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे मुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9, सह महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (च) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.   दाखल गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शफिक शेख हे करीत आहेत. 

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका Read More »

IMG 20240322 WA0003

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना   मिळाली होती.  मिळालेल्या माहितीवरून तत्काळ पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार (राहणार साकत ताजी अहमदनगर) याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी हरिभाऊ मौला पवार (गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर) याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  तिसरी कारवाई  साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात   छापा टाकला असता आरोपी सोपान हरिभाऊ पवार (गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर) याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात 16.30 पास्ता छापा टाकला असता आरोपी आकाश महिपती पवार (गाव,रा साकत ता, जि अहमदनगर) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट Read More »

Prostitution Racket

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू  असणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा सातत्याने पर्दाफाश होत आहे.    पुन्हा एकदा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट पर्दाफाश झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.  पोलिसांनी या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत चार मुलींना वाचवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निगडी परिसरातील फिनिक्स स्पामध्ये वेश्याव्यवसायाचा काळा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलिसांनी  कारवाई करत चार मुलींची सुटका केली असून स्पाच्या महिला व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, अनैतिक वाहतूक प्रतिबंध विभागाला निगडीतील इन्स्पिरिया मॉलमधील फिनिक्स नावाच्या स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर पोलिसांनी त्या स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवले. वेश्याव्यवसायाची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ‘स्पा’वर छापा टाकला. या प्रकरणात चार मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आले. महिला व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दिनेश गुप्ताचा ते शोध घेत आहेत. पैशाचे आमिष दाखवून मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस चारही मुलींना पुनर्वसन केंद्रात पाठवू शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक Read More »

Screenshot 2024 03 18 11 35 47 77 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

Pune News: डोक्यात गोळी नंतर धारदार शस्त्रांनी वार.. हॉटेलमध्ये हिस्ट्रीशीटरची निर्घृण हत्या

Pune News:  पुण्यात एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.  इंदापूर येथील रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री जेवायला गेलेल्या अविनाश धनवे (31) यांची निर्घृण हत्या करण्यात आली.  हल्लेखोरांनी मित्रांसोबत बसलेल्या अविनाशच्या डोक्यात आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये इतरही अनेक लोक उपस्थित होते. त्याचवेळी मयत अविनाश धनवे याच्यासोबत असलेले त्याचे तीन साथीदार गोळीबार होताच घटनास्थळावरून पसार झाले.  प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून या हत्येमागचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे. वृत्तानुसार, पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असलेल्या अविनाशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर 6 ते 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शनिवारी रात्री आठच्या सुमारास तो आपल्या तीन मित्रांसह इंदापूर येथील हॉटेल जगदंबा येथे जेवायला गेला होता. त्यानंतर मागून 6 ते 7 हल्लेखोर आले आणि त्यांनी खुर्चीवर बसलेल्या अविनाशच्या डोक्यात गोळी झाडली.    हत्येनंतर आरोपी हॉटेलबाहेर त्यांच्या कारमध्ये फरार झाले. हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, एसपी पंकज देशमुख यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. देशमुख यांनी हल्लेखोरांना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले की, काल रात्री इंदापूरमध्ये अविनाश धनवे नावाच्या हिस्ट्रीशीटरवर धारदार शस्त्रांनी गोळ्या घालून खून करण्यात आला.  प्रथमदर्शनी हे दोन प्रतिस्पर्धी गटांमधील जुन्या शत्रुत्वाशी संबंधित असल्याचे दिसते. घटनेदरम्यान सीसीटीव्हीत दिसलेल्या आठ जणांची आम्ही ओळख पटवली आहे.  आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. तपास चालू आहे.

Pune News: डोक्यात गोळी नंतर धारदार शस्त्रांनी वार.. हॉटेलमध्ये हिस्ट्रीशीटरची निर्घृण हत्या Read More »

Police

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या

Pune News: पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घेटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या लोभापोटी पत्नीने पतीची हत्या केली. महिलेने प्रियकरासह हा गुन्हा केला. आरोपीने पीडितेच्या डोक्यावर हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली. पिंपरी-चिंचवड शहरात एका महिलेने लष्करात काम करणाऱ्या प्रियकरासह पतीची हत्या केली. ही घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सवर पत्नीचा डोळा होता. दोघेही ते पैसे आपापसात वाटून घेणार होते. राहुल सुदाम गाडेकर (36) असे आरोपी महिलेच्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी राहुलची पत्नी सुप्रिया गाडेकर आणि तिचा प्रियकर सुरेश पाटोळे आणि त्याचा साथीदार रोहिदास सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपी सुरेश हा भारतीय लष्करात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत राहुल गाडेकर यांची पत्नी सुप्रिया ही संगमनेर तालुक्यातील निमगाव पंगा येथे गेल्या दोन वर्षांपासून लॅब चालवत होती.  तिथे ती लष्करात कार्यरत असलेल्या सुरेशच्या प्रेमात पडली. हा प्रकार पती राहुलला समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत होती. यानंतर सुप्रियाने प्रियकराच्या मदतीने पतीला मार्गावरून दूर करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच सुरेश पाटोळे सुट्टीवर घरी आले होते, तेव्हा त्यांनी राहुलला मारण्यासाठी दोन लोखंडी हातोडे खरेदी केले होते. त्याचवेळी राहुल गाडेकर यांनी एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याची माहिती पत्नी सुप्रियाला होती. राहुलच्या मृत्यूनंतर ती सुरेश आणि त्याच्या साथीदाराला काही पैसे देणार होती. राहुल गाडेकर चाकण येथील एका कंपनीत कामावर जात असताना आरोपी सुरेश व रोहिदास यांनी पाठीमागून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. राहुलचा खून केल्यानंतर आरोपी सुरेश नोकरीवर रुजू झाला. रोहिदास चिंचपूर गावात आपल्या घरी गेला. मात्र तपासादरम्यान पोलिसांना पत्नीवर संशय आला आणि चौकशीत सत्य बाहेर आले. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना आळंदी पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या Read More »

B.S.Yadurappa

B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल

B.S.Yadurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा  यांच्यावर 17 वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण, 2012 (POCSO) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यदियुरप्पा यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 17 वर्षीय तक्रारदार तिच्या आईसोबत सदाशिवनगर पोलीस ठाण्यात गेली होती, जिथे एफआयआर दाखल करण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, लैंगिक छळाची कथित घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली, जेव्हा आई आणि तक्रारदार लैंगिक छळाच्या दुसऱ्या प्रकरणात मदत मागण्यासाठी येडियुरप्पा यांच्याकडे गेले होते. यदुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली नाही येडियुरप्पा यांनी अद्याप तक्रारीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. POCSO कायदा 2012 अंतर्गत किमान शिक्षा 3 वर्षे आहे. तथापि, हा गुन्हा कोणत्या कलमाखाली येतो. उदाहरणार्थ, कलम 4 अन्वये, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या लैंगिक अत्याचारासाठी न्यायालयाने निश्चित केलेली किमान शिक्षा 20 वर्षांची शिक्षा आणि दंड आहे.

B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल Read More »

Police 1

Maharashtra News : धक्कादायक, एकाच घरात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra News : राज्याची उपराजधानी नागपूर येते एक खळबळजनक घटना घडली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार  मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. घरामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्रीनिवास इलापुंगाटी (वय ५८), पद्मलता इलापुंगाटी (वय ५४) आणि मुलगा व्यंकट इलापुंगाटी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, इल्पुंगटी कुटुंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे. मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात अनेक वर्षांपासून इल्पुंगटी कुटुंब राहत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. नेहमी सकाळी लवकर उठणाऱ्या इल्पुंगटी कुटुंबातील एकही सदस्य गुरुवारी सकाळी बराच वेळ होऊनही घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी हाक मारून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता ते चक्रावून गेले. घरात पती-पत्नी आणि त्यांच्या २९ वर्षांच्या मुलाचे मृतदेह पडले होते. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आरोली पोलीस स्टेशनने घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूमागे षडयंत्र आहे? पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Maharashtra News : धक्कादायक, एकाच घरात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ Read More »