Ahilyanagar News: नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने अतिक्रम मोहीम राबविण्यात येत आहे. आज 25 फेब्रुवारी रोजी मुकुंदनगर परिसरात पोलीस बंदोबस्तासह महापालिकेने अतिक्रम मोहीम हाती घेतली.
यावेळी महापालिकेकडून इरिगेशन रोड, बडी मशिद, अल- अमीन ग्राउंड, गरीब नवाज मशीद, विखे पाटील शाळा परिसर, आयशा मशिद परिसरात अतिक्रम मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अनेक टपऱ्या, हातगाड्या, दुकानावरील पत्र्याचे शेड हटवण्यात आले.
महापालिकेकडून शहरात आणि उपनगर भागात अतिक्रम मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेकडून त्याची माहिती देखील देण्यात आली आहे तसेच वेळापत्रक देखील सार्वजनिक करण्यात आला आहे. याच बरोबर नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास ते तात्काळ काढून घ्यावे. असं आवाहन देखील पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.