Gondia News : गोंदियात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.
गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आलं आहे. ही घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजे सुमारास घडली. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोंदिया शहरात खळबळ उडाली.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व सर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस दल घटनास्थळी पोहोचवून आरोपीच्या शोध घेण्यास सुरुवात केली आहे तर विविध मार्गाने पोलीस टीमला आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे .
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे की नागरिकांनी कोणत्याही अफेला बळी पडू नये.