Dnamarathi.com

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील कांबी येथील शेतकरी नशिर शेख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शेतीच्या किरकोळ वादातून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

शुक्रवारी दि. 21 रोजी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास गावातीलच अलीम बन्नोमियाॅ शेख व दोन अनोळखी व्यक्तींनी शेतीच्या किरकोळ कारणामुळे नशिर शेख यांच्यासह कुटुंबीयातील महिलांना जबर मारहाण करून नशीर शेख यांना राहत्या घरातून बळजबरीने चार चाकी वाहनातून अपहरण करुन आज्ञात ठिकाणी नेऊन लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने व डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण करून रक्तबंबाळ अवस्थेत शेवगाव-पाथर्डी रोडवर अपरात्री आज्ञातस्थळी  सोडून देऊन मारेकरी निघून गेले. 

या प्रकरणात  फिर्याद जखमी नशिर शेख यांचा मुलगा आजिम नशिर शेख यांनी शेवगाव पोलिसात दिली असून आरोपी अलीम बन्नोमियाॅ शेख यांच्यासह दोन साथिदारावर भारतीय दंड संहिता कलम ४५२, ३६५, ३६७, ३४, ३२३ अंतर्गत शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सदर घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *