DNA मराठी

Ahmednagar News: मोठी बातमी! माळीवाडा बस स्थानकासमोर लागली आग

IMG 20240306 WA0005

Ahmednagar News : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर दुपारी साडेबारा – एकच्या दरम्यान आग लागली.

या लागलेल्या आगीमुळे माळीवाडा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील उज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली होती. ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

आग लागल्याची माहिती मिळतात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व काही वेळेतच आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *