Dnamarathi.com

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडलामधील महिलांना दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले.

कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात. 

पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते. मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना 40 कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

शिवपार्वती लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य व कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, शेखर खरमरे, प्रतिभाताई, अर्चनाताई, शबनम इनामदार, प्रभा पाटील, शामल थोरात, नीता कचरे, विक्रम भोसले, संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कर्जत तालुक्यासाठी मागील जिल्हा नियोजन अंतर्गत 13 महिला बचत गटांना 65 लाख रुपयांचे साहित्य वाटप केले होते. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास योजनेच्या अंतर्गत 40 महिला बचत गटांना दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप करण्यासाठीच्या निधीची तरतूद केली आणि प्रत्यक्षात वाटप देखील सुरू आहे. यामध्ये मसाला कांडप, शेवया मशीन, पिठाची गिरणी, स्टॉल आदी वस्तूंचा समावेश आहे.

तसेच पुढच्या वर्षी ज्या जिरायत पट्ट्यामध्ये किंवा तालुक्यात जे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. त्या पिकासाठी आपण उमेद व महावीग यांना सांगून आपणास जे काही साहित्य अपेक्षित राहील त्याबाबत कळवावे. लागेल ते साहित्य पुरवण्याचे काम खा. डॉ. विखे पाटील करेल असे देखील उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले.

निस्वार्थ भावनेने तालुक्याच्या विकासासाठी वारंवार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. एक सुशिक्षित व्यक्ती निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा विकास कसा होतो याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. नगर करमाळा अंतर कापण्यासाठी पूर्वी चार तास लागत होते. 

मात्र आता काम मार्गी लावून वेळेची बचत कशी झाली याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आणि नगर करमाळाचे काम अवघ्या 18 महिन्यात पूर्ण करून तो रस्ता नागरिकांसाठी खुला केला. 

सध्या काही लोक आम्ही किती गरीब हे समाजापुढे दाखवत असतात. पण ती नंतर कसे श्रीमंत होतात कळत सुद्धा नाही. एक सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो कुठल्याही कामांमध्ये टक्केवारी न घेता काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो.

 दरम्यान विखे यांनी यावेळी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले व सुजय विखे पाटील हे कामातून उत्तर देत असतात. तालुक्याची विकासक गती कशी वाढवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत असे मत देखील खासदार विखेंनी यावेळी मांडले.

भारतीय जनता महिला मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत मंडल येथे आयोजित नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाअंतर्गत विश्वनेते नरेंद्र मोदी साहेब यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी नरेंद्र मोदींनी प्रथमतः भारत माता की जय, जय मां काली, जय माँ दुर्गा अशा जयघोषाने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, देशातील लाखो भगिनीही या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. मी त्या सर्व महिलांना आणि उपस्थित महिला भगिनींना नमस्कार करतो.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व भगिनींचे मला अभिनंदन करायचे आहे. कारण मी पुरुषांच्या मॅरेथॉनबद्दल ऐकले होते, परंतु आमच्या महिला कार्यकर्त्या नारी शक्ती वंदनाच्या माध्यमातून गावोगावी जात आहेत. न थकता पायपीट करत आहेत. या माता, या बहिणी आणि मुली मोदींच्या रक्षणासाठी चिलखताप्रमाणे उभ्या आहेत. आज प्रत्येक देशवासी स्वत:ला मोदींचे कुटुंब म्हणवत आहे.

 आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक बहीण आणि मुलगी म्हणत आहे मी मोदींचे कुटुंब आहे. या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्यासह संपूर्ण भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत असे उपस्थितांना त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *