Dnamarathi.com

Ahmednagar News:  अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय साहाय्यकाने लाच मागितल्या प्रकरणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यामुळे शहर खळबळ उडाली आहे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे नऊ लाख तीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडीनंतर हे प्रकरण आठ लाख रुपयांमध्ये मिटवण्याचा ठरलं होते.

 त्यानंतर तक्रार यांनी जालना कार्यालयात 19 जून 24 रोजी तक्रार अर्ज दिला होता या प्रकरणांमध्ये  19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे.

 संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबी कारल्याने संयुक्त कारवाई केली आहे.

याप्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला.

 आयुक्त भ्रष्टाचारी आहेत यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती मात्र उशीर झाला आहे पण कारवाई झाल्यामुळे आम्हाला समाधान असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली.

 तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकरणांमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यासह नगर रचना आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचेही पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *