Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 28 नोव्हेंबर 2026 रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही झाला आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,28,410 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,710 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यातही 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,28,410, तर 22 कॅरेटचा भाव ₹1,17,710 प्रति 10 ग्रॅम आहे.
दिल्लीतील सोन्याचा भाव
राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,28,560 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,17,860 प्रति 10 ग्रॅम आहे. एक दिवस आधी दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात तब्बल ₹3,100 ची वाढ झाली होती.
प्रमुख शहरांतील आजचे दर
आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ फरक पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,710 प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,28,410 प्रति 10 ग्रॅम आहे. राजधानी दिल्ली आणि जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,17,860, तर 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,28,560 प्रति 10 ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,760, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,28,460 प्रति 10 ग्रॅम आहे.
दरम्यान, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,710, तर 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,28,410 प्रति 10 ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचाही परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 3,639.6 डॉलर प्रति औंस इतका आहे. या आठवड्यात जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत जवळपास 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दराला आधार मिळाला आहे.
चांदीही महागली
सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबरच्या सकाळी चांदीचा भाव ₹1,70,100 प्रति किलो होता. मागील दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल ₹13,500 ची वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव 43.44 डॉलर प्रति औंस आहे.






