DNA मराठी

Ankush Kakade : ‘पवार साहेबांच्या पक्षाचे ऑपरेशन करण्याइतका सर्जन अजून जन्माला नाही’ राष्ट्रवादीच्या खासदारांबाबतच्या चर्चांना अंकुश काकडेंचा पूर्णविराम

ankush kakade

Ankush Kakade : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्षाचे सर्व आठ खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदारांच्या नाराजीच्या किंवा पक्षांतराच्या चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट करत 2029 मध्ये पुन्हा जनतेसमोर जायचे असल्याने सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोणत्याही कामानिमित्त नेते एकमेकांना भेटू शकतात, त्यातून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले.

शरद पवार यांना त्यांच्या खासदारांबाबत कोणतीही अस्वस्थता नसल्याचे सांगत पक्ष फोडण्याच्या चर्चांवरही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *