DNA मराठी

NZ vs IND 2026 : न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया; 6 वर्षांनंतर पुन्हा कसोटी मालिका

nz vs ind

NZ vs IND 2026 : भारतीय क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून हा दौरा दोन्ही देशांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा द्विपक्षीय क्रिकेट दौरा ठरणार आहे. या दौऱ्यात भारत 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.

विशेष म्हणजे भारत तब्बल सहा वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये अखेरची कसोटी मालिका 2019-20 मध्ये खेळली होती.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, एकूण 12 सामन्यांचा हा दौरा त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दौरा ठरणार आहे. सामने न्यूझीलंडमधील प्रमुख पाच शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

दौऱ्याचे वेळापत्रक

टी-20 मालिका

22 ऑक्टोबर – पहिला टी-20, क्राइस्टचर्च

24 ऑक्टोबर – दुसरा टी-20, क्राइस्टचर्च

27 ऑक्टोबर – तिसरा टी-20, वेलिंग्टन

30 ऑक्टोबर – चौथा टी-20, ऑकलंड

1 नोव्हेंबर – पाचवा टी-20, हॅमिल्टन

वनडे मालिका

4 नोव्हेंबर – पहिला वनडे, ऑकलंड

7 नोव्हेंबर – दुसरा वनडे, वेलिंग्टन

10 नोव्हेंबर – तिसरा वनडे, हॅमिल्टन

13 नोव्हेंबर – चौथा वनडे, माउंट माऊंगानुई

15 नोव्हेंबर – पाचवा वनडे, माउंट माऊंगानुई

कसोटी मालिका

19 ते 23 नोव्हेंबर – पहिली कसोटी, वेलिंग्टन

27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर – दुसरी कसोटी, क्राइस्टचर्च

क्रिकेट चाहत्यांसाठी हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार असून न्यूझीलंडच्या वेगवान आणि स्विंगला अनुकूल खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *