DNA मराठी

Donald Trump on Iran War : अखेर युद्धबंदी! इराण अमेरिका एकमत; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

donald trump

Donald Trump on Iran War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धाचा आज शेवट झाला आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत पुढील 15 दिवसांसाठी युद्धबंदीची घोषणा केली आहे.

यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, त्यांनी मला विनंती केली आहे की आज रात्री इराणवर होणारी लष्करी कारवाई थांबवावी. इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पूर्णपणे आणि सुरक्षितपणे उघडण्याचे मान्य केल्यास, मी पुढील दोन आठवडे इराणवरील बॉम्बफेक आणि हल्ले थांबवण्यास तयार आहे. हा दोन्ही बाजूंनी पाळला जाणारा युद्धविराम असेल!

​हे पाऊल उचलण्याचे कारण म्हणजे, आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत. इराण आणि मध्य पूर्वेमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या कराराच्या आम्ही खूप जवळ आहोत. आम्हाला इराणकडून १० मुद्द्यांचा एक प्रस्ताव मिळाला असून, तो चर्चेसाठी योग्य वाटतोय. अमेरिका आणि इराणमधील वादाचे जवळपास सर्व मुद्दे सुटले आहेत, फक्त हे दोन आठवडे आम्हाला हा करार अधिकृतपणे पूर्ण करण्यासाठी लागतील. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य पूर्वेतील देशांचा प्रतिनिधी म्हणून, हा जुना प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *