Health Tips: आज अनेकजण वजन वाढल्यामुळे त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय देखील करतात मात्र त्यांना काहीच फायदा होत नाही.
या लेखात आम्ही तुम्हाला आज लिंबू आणि गुळापासून वजन कमी करण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.
आम्ही तुम्हाला सांगतो लिंबू आणि गुळापासून बनवलेले पेय तुम्हाला वजन कमी करण्यास तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.
काही अतिरिक्त किलो वजन वाढवणे सोपे आहे मात्र तितकेच वजन कमी करणे कठीण आहे. अनेकांचे सध्याच्या काळात चांगलेच वजन वाढले आहे. खासकरून अनेकांची पोटाची चरबी वाढली आहे. दरम्यान, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे गरजेचे असते.
मात्र बऱ्याचदा काही सोप्या टिप्सही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
या लेखात तुम्हाला आम्ही साध्या गूळ-लिंबाच्या काढ्याबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी कऱण्यास मदत होईल.
या काढ्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत गूळ आणि लिंबू. दोन्ही साहित्य प्रत्येक भारतीय घरात आढळते. लिंबू आणि गूळ दोन्हीचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत. तसेच हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
कसे करते काम
गुळामुळे पाचनक्रिया वाढण्यास मदत होते ज्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. यात प्रोटीन तसेच फायबरही असतात. ही पोषक तत्वे वजन घटवण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
लिंबूचा रस शरीराला डिटॉक्स करण्याचे तसेच वजन घटवण्यास मदत करतात. यात पॉलिफेनॉल अंटीऑक्सिडंटही असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे अंटीऑक्सिडंट शरीरातील चरबी वाढवणे रोखतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.
गूळ गोडासाठी साखरेसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण यात कॅलरीज कमी असतात. तसेच गुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. एकत्र गूळ आणि लिंबूचा काढा प्यायल्यास पचन आणि श्वसनतंत्र साफ करण्यास मदत करतात.
कसा बनवायचा काढा
एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा गुळाची पावडर मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि एक चमचा लिंबाचा रस टाका. पुन्हा मिश्रण चांगले ढवळा. वजन घटवण्यासाठी तुम्ही हे पेय दररोज उपाशी पोटी घेऊ शकता.