Ahmednagar News: यावर्षी देखील भिंगार येथे सकल मराठा समाजाचे वतीने भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा व तसेच उंट, घोडे,मावळे, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची रॅली विजय लाईन चौक ते वृंदावन मंगल कार्यालय पर्यंत काढण्यात आली होती येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होणार आहे यावेळी विविध मान्यवरांच्या सत्कार देखील करण्यात आले.
यावेळी राजेश काळे,संजय सपकाळ,संपत बेरड, शामराव वागस्कर,पंकज चव्हाण,गणेश सातकर, श्रीकांत शिरसागर, भूषण थोरात, अंकुश शिंदे, गणेश शिंदे, हर्षद काळे, अरुण चव्हाण, अमोल वागस्कर, कांता बोटे, अभिजीत सपकाळ, गणेश शिंदे,पंकज चव्हाण भूषण थोरात, मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता.
या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्यावतीने लेझीम, जानपदक, ढोल पथक, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मात्र सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.